पिंपरी: संस्कारची दिवाळी अतिदुर्गम भामरागड, अहेरी, आलापल्ली,जिमलगट्टा या भागातील आदिवसी बांधवांसोबत तसेच आनंदवन आणि लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा यांच्यासोबत साजरी झाली.
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, जीमलगट्टा, आलापल्ली येथील येथील आदिवासीं बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी अंध,अपंग, निराधार,कुष्ठरोगी व गरजवंत नागरिकांसाठी दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त लहान मोठे मुलं,मुली व महिला,पुरुष यांना कपडे,फराळ,मिठाई,औषधे,आकाश कंदील,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच विकलांग विद्यार्थ्यांकरीता साहित्यासह इतर जीवनाश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.
येथील नागरिकांमध्ये खूप उत्साहाचे आणि त्यांच्यामध्ये अफाट आनंद द्विगुणित करणारे वातावरण निर्माण झाले होते. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने आदिवासी गरजवंतांकरीता मदतीसाठी फेसबुक आणि वाॕटसपच्या माध्यमातून केलेल्या जाहिर आवाहनाला  प्रतिसाद दिला त्यामुळे लोकांना लागणारे  आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
संस्कार प्रतिष्ठानची टिम दि.२४ ऑक्टोंबर २०२४  ला बाबा आमटे यांच्या वरोरा येथील आनंदवन येथे पोहोचली.त्यांनी तिथे कडू सर यांची भेट घेत अंध अपंग मुकबधीर निराधार कुष्ठरोगी व शालेय विद्यार्थ्यांना दीपावलीनिमित्त कपडे,साड्या,साखर,आकाश कंदिल उठणे तांदूळ डाळ  सुपुर्त केली, तेथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या  पुरूष व महिलांना कार्यकत्यांनी स्वतः त्यांच्या जवळ जावून कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले. व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
   दि.२५ ऑक्टोंबर २०२४ हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयाकरीता त्यांना आवश्यक असलेल्या औषधे दिली तेथील विद्यार्थ्यांना व महिलांना ही दीपावलीनिमित्त साड्या रवा मैदा आकाश कंदील उटणे साबण इत्यादींचे मोठ्या प्रमाणावर वाटप हेमलकसाचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौ मंदाताई आमटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
   दि.२६ ऑक्टोंबर २०२४ रोजी भामरागड आलापल्ली अहेरी जीमलगट्टा  येथील आदिवासी पाड्यांवर जाऊन व गावोगावी जाऊन संस्कार प्रतिष्ठान महा.राज्यचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड, संस्कार प्रतिष्ठानचे आनंद पुजारी,विलास सैद,संजीत पद्मन,स्मिता पद्मन,प्रभाकर मेरुकर,संध्या स्वामी,वैशाली मिरजकर,तानाजी भोसले,नाना राऊत,रोहित मोरे,सुरज मंडल,नामदेव फलफले,सूर्यकांत बारसावडे तुकाराम कदम या सर्व सभासदांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
  गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ३५०० आदिवासी बांधवांना यावेळी वाटप करण्यात आली. यावर्षी टाटा मोटर्स पुणे आणि महिंद्रा लॉजिस्टिक चाकण सहभागी झाले होते.  यावर्षी रत्नागिरी राजापूर चिपळूण सातारा कोल्हापूर इचलकरंजी पुणे पिंपरी चिंचवड शहर या भागातून साहित्य जमा झाले होते, गरजवंतांकरीता केलेल्या अनमोल सहकार्यासाठी संस्कार प्रतिष्ठानचे खूप कौतुक करून सर्वांना शाबासकीची थाप डॉक्टर प्रकाश आमटे यांनी दिली.तसेच या उपक्रमात साहित्य जमा करून जीमेलगट्टा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पुढील कार्यक्रमासाठी दिले म्हणून विभागीय पोलीस अधिकारी श्रीयुत शशिकांत दसुरकर यांनी स्वा हस्ते आभार पत्र देवून सन्मानित करण्यात केले.
दि.२३ ऑक्टोंबर २०२४  संध्याकाळी ५.०० वाजता गडचिरोलीत साहित्य घेऊन जाणाऱ्या गाडीचे पुजन चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विठ्ठल साळुंखे यांनी  गाडीची पुजा करून त्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला होता.
       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कार प्रतिष्ठानचे डॉ.मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पाथरे, मनोहर कड, नम्रता बांदल, ओम पाथरे, मिलन गायकवाड आनंद पुजारी, विलास सैद, प्रिया पुजारी,संध्या स्वामीं,मनिषा आगम, विजय आगम,स्वाती म्हेत्रे , प्रभाकर मेरुकर ,सुप्रिया गायकवाड, सुनिता गायकवाड ,मिनाक्षी मेरुकर ,कल्पना तळेकर  ,भानुप्रिया पाटील ,सायली सुर्वे ,सुनंदा निक्रड ,नम्रता बांदल ,धनश्री चव्हाण,शिला गायकवाड, कविता वाल्हे ,जयवंत सूर्यवंशी ,मोहिनी सूर्यवंशी,अनघा दिवाकर ,अंजू सोनवणे,सरिता साने ,मानसी कदम ,चिपळूण, लीना नलावडे गणपतीपुळे, श्रुती ताम्हणकर राजापूर, असे अनेकांनी अथक परिश्रम घेतले.
पिंपरी चिंचवड मनपा सेवा निवृत्त शिक्षक संघटना आणि मोहन पटाधारी यांनी मोलाचे सहकार्य केले. एमआयटी कॉलेज आळंदी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार व प्राथमिक विद्यालय आकुर्डी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय वाघोली, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संत तुकाराम विद्यालय लोहगाव जयवंत प्राथमिक विद्यालय भोईर नगर यांनी साहित्य जमा करण्यास मदत केली.

वाटप केलेल्या साहित्यात १) साखर – १५७८ कि.२)रवा- २२८ की.३)तेल – १६३४)डाळ – ९४ कि.५) साबण – २१० नग ६)  उटणे – १५० नग ७) गुळ – १६ कि. ८) बिस्किट पुडे- १४६ नग ९) मैदा – ११७ कि. १०) तांदूळ – ४५ की. ११) डालडा – १० की.१२) बेसन पीठ – ४ की.१३) पोहे – ५ कि १४) सुवासिक तेल – ५० नग १५) गहू १० कि रेशनिंग १६) ज्वारी ३ कि.१७) आकाश कंदील ५० नग.साड्या २७५३ नग,पॅन्ट शर्ट १२५० नग,महिलांचे ड्रेस ११०० नग,लहान मुलांचे ड्रेस नवीन २२५ नग,लहान मुलांचे ड्रेस जुने ८२५ नग या साहित्याचा समावेश होता.

error: Content is protected !!