पनवेल: नवघर (उरण )येथे सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेलच्या शब्दवेल दिवाळी अंक बोलीभाषा विशेषांकाचे प्रकाशन रायगड भुषण प्रा. एल. बी. पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले तर  याप्रसंगी बोलीभाषांमधील साहित्य खऱ्या अर्थाने अभिजात असल्याचे मत यावेळी प्रा. एल. बी. पाटील यांनी व्यक्त  केले. या दिवाळी अंकाच्या  संपादक पदाची जबाबदारी देवेंद्र इंगळकर,अतिथी संपादक- प्रा. प्रतिभा सराफ, कार्यकारी संपादक -मनीषा शिरटावले, उपसंपादक- अश्विनी कोठावळे, सह-संपादक-विलास पुंडले व रामदास गायधने, व्यवस्थापक-अमोल चरडे, शब्दवेलच्या सचिव अश्विनी अतकरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
यावर्षी महाराष्ट्रातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या बोलीभाषांमधील साहित्य घेऊन  बोलीभाषा विशेषांक प्रकाशित करण्यात आला.  कार्यक्रमाचे आभार शब्दवेलचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी मानले. याप्रसंगी मच्छिंद्रनाथ म्हात्रे, अध्यक्ष कोमसाप उरण, रामचंद्र म्हात्रे- अध्यक्ष मधुबन कट्टा )भरत पाटील सचिव  मधुबन कट्टा, सुनंदा पाटील उपस्थित होत्या.

error: Content is protected !!