सोनाली गोरे यांनी मानले अनिता रायबोलेंचे आभार लोणावळा :रेल्वेने प्रवास करताना मौल्यवान वस्तू, महत्वाची कागदपत्रे हरवली तर वाईट वाटणे. दु:ख होणे स्वाभाविक आहे. पण त्याच हरवलेल्या वस्तू परत मिळाल्यावर आनंदही तितकाच होतो. असाच आनंद सोनाली गोरे यांना झाला. आणि हा आनंद त्यांना मिळवून देणा-या आरपीएफच्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर अनिता रायबोले यांच्या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
त्याच झाले असे, २ सप्टेंबर २०२४ या दिवशी शिवाजीनगर ते लोणावळा या सायंकाळच्या लोकल  प्रवासात  सोनाली गोरे यांचे तीन तोळे सोने व महत्त्वाची कागदपत्रे असणारी बॅग लोकल मधे राहून गेली. ती बॅग गोरे यांना परत मिळाली तेव्हा आपसुकच त्यांच्या ओठातून कृतज्ञतापूर्वक आभाराचे शब्द बाहेर पडले.
सोनाली गोरे यांची  पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यासा निमित्त  लोकलने जाणे येणे चालु असते.२सप्टेंबर २०२४ ला नेहमी प्रमाणे शिवाजीनगर  लोणावळा लोकल मध्ये त्या बसल्या आणि गर्दी असल्यामुळे दागिने व कागदपत्रे असलेली बॅग रॅक मध्ये ठेवली. सोबत अजून एक बॅग होती तीही बॅग ठेवली.
त्यांचे स्टेशन आले आणि त्या दोन पैकी एकच बॅग घेऊन खाली उतरल्या.  घरी गेल्यानंतर लक्षात आले की एक बॅग राहिली. तेव्हा खूप दुःख झाले. कारण खूप महत्त्वपूर्ण कागदपत्र आणि सोन होते. खूप हळहळ वाटली.
त्यानंतर त्यांनी लोणावळा  आरपीएफशी संपर्क साधला. अनिता रायबोले यांच्याशी त्या बोलल्या. त्यांनी सर्वात पहिले खूप मानसिक आधार दिला. त्यानंतर तक्रार कुठे आणि कशी नोंदवायची याची सविस्तर मार्गदर्शन केले.आणि रायबोले यांच्या सह टीमने तपासाची चक्र फिरवत हरवलेली बॅग शोधली.

सोनाली गोरे म्हणाल्या, ” जेव्हा बॅग मिळाली तेव्हा रायबोले यांनी लगेच काॅल करून मला बॅग मिळाल्याची बातमी दिली. तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. मी त्याना भेटायला गेले तर मी त्यांची अतिथी आहे अशा प्रकारे वागणुक दिली.
त्यांच्याशी  गप्पा मारल्यानंतर समजल की त्या दुर्गम भागातील असुन सर्वसामान्य लोकांची दुःख समजून घेणाऱ्या आहेत. खूप लोकांना त्या रेल्वे अपघातात मदत करतात. तेही स्वखर्चाने  स्वतःच्या तत्त्वाशी एकनिष्ठ आहेत. त्याच नव्हे तर त्यांचे सहकारी यांनी मदत केली.

error: Content is protected !!