पवनानगर (प्रतिनिधी) : कै. प्रकाश गंगाराम कालेकर आणि रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांच्या वतीने , शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने पवनानगर चौक , पवनानगर येथे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे आणि त्यांच्या पत्नी डॉ.उज्ज्वला भेगडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती. महिलांनी रविंद्र आप्पा भेगडे यांचे जल्लोषपूर्ण स्वागत केले.
मनोरंजक खेळ ,गप्पा आणि उखाणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. निवेदक अक्षय मोरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सादरीकरण केले गेले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक फ्रीज आणि पैठणी , द्वितीय वॉशिंग मशीन आणि पैठणी , तृतीय एलएडी टीव्ही आणि पैठणी , चतुर्थ क्रमांक शिलाई मशीन आणि पैठणी अशी बक्षिसे निर्धारित करण्यात आली होती. तर , स्पर्धेसाठी उपस्थित महिला वर्गासाठी , लकी ड्रॉ पद्धतीने , प्रथम क्रमांक पीठ गिरणी आणि पैठणी , द्वितीय क्रमांक कुलर आणि पैठणी , तृतीय क्रमांक ओव्हन आणि पैठणी , चतुर्थ क्रमांक गॅस शेगडी आणि पैठणी अशी बक्षिसे निर्धारित करण्यात आली होती.
या स्पर्धेत , प्रथम बक्षीस – सुरेखा संदीप ठूले , द्वितीय – सुमित्रा ज्ञानेश्वर शिंदे , तृतीय – जयश्री गणपत दहिभाते , चतुर्थ क्रमांक – काजल नढे तर , लकी ड्रॉ स्पर्धेत , बायडाबाई तुपे – पहिले बक्षीस ,वैशालीताई ठुले -दुसरे बक्षीस , माथाबाई भालेसैन- तिसरा क्रमांक , स्वाती दिनेश मालपोटे – चौथा क्रमांक या महिलांनी बक्षिसे पटकावली.
याप्रसंगी , भावना व्यक्त करताना रविंद्र आप्पा भेगडे म्हणाले , “महिलांचे सन्मान पर्व म्हणून , आपण सर्वजण शारदीय नवरात्र साजरी करतो. हा कार्यक्रम केवळ तुम्हा महिलांच्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून , विरंगुळा मिळावा म्हणून आयोजित करण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत , तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार..! , नवरात्रोत्सव हा वाईटशक्तींवर चांगल्याचा विजय ह्या अर्थाने आपण साजरा करतो. आपल्या मावळ मध्ये गुंडगिरी , दपडशाही , एकाधिकारशाही यांना कधीही थारा दिला जाऊ शकत नाही .
कारण , आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे लोहगड आणि विसापूरच्या कुशीत वाढलेले स्वाभिमानी मावळे आहोत. प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. तो जर कुणा एकट्याच्या मुजोरीमुळे हिरावला जात असेल तर , त्या प्रवृत्तीला आपल्याला दूर सारवे लागेल.” रविंद्र आप्पा भेगडे यांच्या पत्नी डॉ.उज्ज्वलाताई भेगडे यांची पूर्णवेळ उपस्थिती या कार्यक्रमाला होती. त्यांनी देखील सहभागी महिलांचा उत्साह वाढवत त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी , मा.जिल्हा परिषद सदस्या अलकाताई धानिवले,महागाव चांदखेड गटाचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर भाऊ आडकर,श्री संदीप भाऊ भुतडा,श्री.बबन भाऊ कालेकर,युवा नेते निलेश भाऊ ठाकर,काले गावचे सरपंच खंडू भाऊ कालेकर,पवन मावळ भाजपा महिला आघाडी अध्यक्षा अश्विनीताई साठे, श्री.प्रशांत भाऊ लगड,श्री.सचिन भाऊ मोहिते,श्री.भाऊ कालेकर ,श्री.सोमनाथ भाऊ बोडके यांच्यासह कै.प्रकाश गंगाराम कालेकर प्रतिष्ठान व रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच चे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व पवन मावळ पंचकृषीतील माता व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!