तळेगाव दाभाडे: येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापिका अर्चना येवले यांना श्री सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ टेकनॉलॉजी अँड मेडिकल सायन्सेस (एसएसएसयूटीएमएस ), सिहोर  मध्य प्रदेश येथे रसायन शास्त्र या विषयामध्ये नुकतीच डॉक्टरेट  ही पदवी प्रदान करण्यात आली.
प्राध्यापिका अर्चना येवले यांनी पीएचडी साठी कॅरॅक्टरायझेशन अँड फिजिकल ऍट्रिब्यूट्स ऑफ नॅनो पॉलिमर कॉम्पोझीट या विषयामध्ये  रिसर्च गाईड डॉ. एन पी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च सेंटर युनिव्हर्सिटी टीचिंग डिपार्टमेंट, एसएसएसयूटीएमएस , सिहोर, मध्य प्रदेश येथे संशोधन केले.
  संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे,  उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे,  सहसचिव नंदकुमार शेलार,  खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के,  कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई,अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ अपर्णा पांडे, डॉ.विलास देवतारे  यांनी  डॉ.अर्चना येवले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी काळात नॅनो पॉलिमर कॉम्पोझीट  या विषयांमध्ये नवनवीन संशोधन करून त्याचा उपयोग महाविद्यालय तसेच समाजासाठी करण्याचा मानस डॉ.येवले यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!