तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा तळेगाव येथे संपन्न कार्ला: पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग ) व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता चौथी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव येथे पार पडली. गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत प्रज्ञाशोध परीक्षेविषयी जिल्हा परिषद पुणे शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय नाईकडे यांच्या सुचनेनुसार मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ मध्ये येणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करून घेणेसाठी नियोजन करणे गरजेचे आहे शिक्षकांनी प्रज्ञाशोध परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे आव्हान स्वीकारले तर गुणवत्ता वाढ होण्यास मदत होईल.तसेच स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी चौकस होण्यास मदत होईल.त्या अनुषंगाने तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.विस्तार अधिकारी शोभा वहिले यांनी सर्वाना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे मिलिंद शेलार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ङाङायावेळी सचिन कोळवणकर, संदीप मगर, दिलीप टकले, रावसाहेब शिरसाट,रेणू शर्मा , निर्मला काळे,सविता क्षीरसागर, सुनंदा दहितुले केंद्रप्रमुख उपस्थित होते. मराठी,गणित इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाचे अचूक व प्रभावी अध्यापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचे घटकनिहाय सखोल मार्गदर्शन तसेच स्वतःचे अनुभव व प्रेरणा देऊन मंगल आहेर , उमेश माळी , सरोजा अंबुलगे, कृपा पवार , ऋतुजा जागीरदार यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.मावळ तालुक्यातील २१३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २१५ प्रशिक्षणार्थी शिक्षक या कार्यशाळेला उपस्थित होते.विषय साधन व्यक्ती ज्योती लावरे यांनी कार्यशाळेचे उत्तम नियोजन,सूत्रसंचालन करत सर्वांचे आभार मानले.
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित
- गणेशोत्सवानिमित्त जांभुळगावला श्री. गणेश मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी
- भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे शक्तिप्रदर्शन : लोणावळ्यामधील गणेशोत्सव दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
- गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम