रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाच्या वतीने शिवालयात फराळ वाटप 

वडगाव मावळ: रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचातर्फे मावळ तालुक्यातील विविध शिवालयांमध्ये फराळ वाटप करण्यात आला श्रावणी सोमवार निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्रावणी  सोमवारचे  औचित्य साधून श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभवली, श्रीक्षेत्र घोरावडेश्वर देवस्थान घोरावडी, श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान देहूगाव येथे रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाच्या तर्फे फराळ वाटप करण्यात आले.

 श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये आणि उपवास धरणाऱ्या भाविकांची संख्या अधिक  आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन , दर्शनार्थी भाविकांच्या सोयीसाठी हे फराळ वाटप आयोजित केल्याचे रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

याप्रसंगी घोरावडेश्वर येथे प्रदेश भाजपा युवा मोर्चा सचिव रघुवीर शेलार, उद्योजक श्रीकृष्ण भेगडे, उद्योजक महेद्र सुतार,उद्योजक अभिजीत उर्फ टायगर भेगडे, उद्योजक गोविंद अल्लाट , योगेश  शेलार ,कोंडेश्वर मंदिर जांभवली येथे मावळ भाजपा युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रणेश नेवाळे व त्यांचे सर्व युवा सहकारी उपस्थित होते. तर श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देहूगाव येथे भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष  हागवणे, उद्योजक राहुल भेगडे, सचिन काळोखे,उद्योजक मयूर शेलार ,सागर मुसुडगे,रायबा मोरे  उपस्थित होते.

error: Content is protected !!