तळेगाव दाभाडे:नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या वासंती काळोखे,पर्यवेक्षक शरद जांभळे , शिक्षक प्रतिनिधी योगेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रभा काळे तसेच ज्येष्ठ अध्यापिका अरुणा बुळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता आगळमे यांनी केले.अनेक विद्यार्थ्यांनी भाषणातून गुरूविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पद्य आणि सुंदर असे गीत सादर केले.
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी इयत्ता नववी अ,ब,क च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी केली. या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना श्रीफळ दोन पेन ,गुलाब पुष्प तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले भेट कार्ड देऊन सन्मानित केले. सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी सानिका कोरडे व पूर्वी भालेकर यांनी केले.
विद्यालयातील इंग्रजी विषयाच्या अध्यापिका सौ. ऐश्वर्या शिंदे मॅडम यांनी गोष्टी रूपातून गुरु महिमा व्यक्त केला तसेच शाळेतील ज्येष्ठ अध्यापक बापूसाहेब पवार यांनी भारतीय संस्कृती तसेच पाश्चिमात्य संस्कृती मधील गुरू शिष्यांची उदाहरणे देऊन अतिशय प्रभावीपणे गुरु महिमा व गुरुपौर्णिमेविषयी आपले मत विद्यार्थ्यांसमोर मांडले.
प्राचार्या काळोखे यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थी जीवनात कृतज्ञता,नम्रता व श्रवण कौशल्य यांचे महत्त्व व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रभा काळे यांनी मानले.
कार्यक्रमाचे सर्व नियोजन बापुसाहेब पवार , ज्योती धनवट तसेच अनिता आगळमे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस