चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची पाद्य पूजा करून केली गुरु पौर्णिमा

इंदोरी:

येथील इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई येथे गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत आनंद आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी  पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदना, सरस्वती वंदना आणि परमपूज्य सद्गुरु गगनगिरी महाराजांच्या पादुकांच्या पूजनेने करण्यात आली. 

मानवी जीवनामध्ये गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्येआई वडील हे गुरू आहेत.मुलांमध्ये बाल्य अवस्थे पासून  आई-वडिलांविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञता वृद्धिंगत व्हावी, तसेच भारतीय संस्कृतीची जोपासना केली जावी या उदात्त हेतूने मातृ-पितृ पाद्यपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.  पुरोहितांच्या  वेदमंत्राद्वारे  पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला.  सर्व पाल्यांनी आपल्या आई-वडिलांचे पाद्यपूजन अत्यंत भक्तिभावाने केले. 

उपस्थित सर्व पालकांनी आपल्या मुलांनी आपले पाद्यपूजन करताना अनुभवलेल्या त्या अविस्मरणीय क्षणांचे वर्णन अत्यंत भावुकतेने केले. तसेच, चैतन्य इंटरनॅशनल स्कूलने घेतलेल्या या भावस्पर्शी उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये शिक्षकांचा मोठा सहभाग होता . कार्यक्रमाचे नियोजन  शाळेच्या प्रिन्सिपल हेमलता खेडकर यांनी केले. श्रींच्या आरती नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

error: Content is protected !!