वडगाव मावळ: 

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर पी आय,(A),एस आर पी ,मनसे,रासप व इतर घटक पक्षाच्या महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार  महाससंदरत्न खासदार श्रीरंग  बारणे यांचा  मंगळवार दिनांक २३/४/२०२४ रोजी मावळ तालुका दौरा आहे.या दौऱ्यात सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.उमेदवार बारणे हे सकाळी ९ वाजता वडगाव मावळ येथून दौ-याला प्रारंभ करणार आहे. १०.३० वाजता कान्हे,११.४५ ला कामशेत,१२.४५ ला कार्ला परिसर,३वाजता लोणावळा व सायंकाळी ६ वाजता तळेगाव दाभाडे असा दौरा असणार आहे.या दौऱ्यात बारणे या परिसरातील प्रमुख नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते,मतदार यांच्याशी संवाद साधणार आहे. या दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!