एनएमआयईटी मध्ये निरोप समारंभ संपन्न

तळेगाव स्टेशन:

नूतन महाराष्ट्र विद्या  प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये अंतिम वर्षाच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. नूतन अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी, कार डायनॅमिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे संचालक अनिरुद्ध गावडे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.

 तसेच बजाज पॉवर इक्विपमेंट  प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक मनोज उडाणे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस , विभाग प्रमुख, डॉ. सागर जोशी, डॉ. सौरभ सावजी, डॉ. सतीश मोरे, डॉ. चंद्रकांत कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

  ‘’सातत्याने स्वतःला स्पर्धात्मक आणि गुणात्मक बनवा. विविध प्रशिक्षणाद्वारे आधुनिक तंत्रज्ञान शिका, तसेच विद्यार्थी दशेत असताना शिस्तीचे पालन करून चांगले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करा, आणि उद्योजक व्हा, आहे उदगार अनिरुद्ध गावडे यांनी बोलताना केले. मनोज उडाणे यांनी संस्थेतील यशस्वी कर्मचारी कसे होता येईल यासंदर्भात मार्गदर्शन केले.डॉ. नितीन धवस यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मिस्टर एनएमआयईटी, मिस एनएमआयईटी, मिस्टर पॉप्युलर, मिस पॉप्युलर आणि इतर बक्षिसे पाहुण्यांचा हस्ते वियार्थ्यांना देण्यात आली. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा जाधव, अतुल्या  मेरी जेस , मनाली साळी, आरुष कुकडे या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. शंकरराव उगले यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. राहुल पाटील, प्रा. भाग्यश्री वऱ्हाडे, प्रा. सोनाली डोंगरे यांनी केले.

error: Content is protected !!