अभिनेते क्षितिज दातेंना टिळक विजापूरकर पुरस्कार
तळेगाव स्टेशन:
मराठी चित्रपट धर्मवीर तसेच लोकमान्य टिळक मालिकेतील अभिनेते क्षितिज दातें यांना नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी च्या वतीने विहंगम २०२३-२४ मध्ये संस्थेचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थचे खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के यांच्या हस्ते टिळक – विजापूरकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे विश्वस्त महेशभाई शहा मुख्य कार्यकारी संचालक डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, अगामी येणाऱ्या यारी चित्रपटातील कलाकार आदी मान्यवर उपस्थित होते. कला क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक यांची लयलूट असलेल्या विहंगम २०२३-२४ या कार्यक्रमाची सुरवात रंगमंच पूजनाने अभिनेते क्षितीज दाते यांच्या हस्ते झाली.
याप्रसंगी यारी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यास आले. छोटे पुढारी दरोडे यांनी अतिशय गावरान संवाद साधून सर्वांची मने जिंकली.
टिळकांच्या मालिकेत टिळकांची भूमिका साकारत असताना टिळकांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळामध्ये टिळक – विजापुरकर पुरस्कार स्वीकारताना क्षितिज दातें यांनी कृतज्ञता व्यक्त केले.
डॉ. सागर जोशी, प्रा. प्रितम अहिरे, सुधाकर ढोरे, प्रीती घुले यांना याप्रसंगी शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे कार्यगौरव पुरस्कार २०२३-२४ ने वर्षभरातील कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉ. शेखर रहाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश मोरे यांनी केले. विहंगम २०२३-२४ च्या नियोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींना परिश्रम घेतले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस