भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभ्यास अभियान
दापोडी( प्रतिनिधी सुरेश शिंदे) :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सलग १८ तास अभ्यास अभियान दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे.सदर अभियान टिबीएसएम संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र दापोडी या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे .
गेली सलग १८ वर्ष हे अभियान राबविले जात असून हे १९ वे वर्ष आहे.स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार असून सकाळी ६ ते रात्री १२ पर्यत सलग १८ तास अभ्यास करून ही मानवंदना डॉ. आंबेडकर यांना दिली जाणार आहे.
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी नाष्टा दुपारी जेवण व रात्री ८ वाजता अल्प उपहार यावेळी देण्यात येणार आहे. सदर उपक्रमासाठी सहभाग नोंदविण्यासाठी ८५३०५९२४५८ संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.