वडगाव मावळ :
भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत वडगाव शहर भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये पक्षाच्या शहराध्यक्ष पदी संभाजी म्हाळसकर यांची तर महीलाध्यक्ष पदी सुनीता भिलारे व युवा मोर्चा अध्यक्षपदी अतिश ढोरे यांची निवड जाहीर करण्यात आली.
पक्षाचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, मावळते शहराध्यक्ष अनंता कूडे, धनश्री भोंडवे, विनायक भेगडे, अरविंद पिंगळे, सोपानराव ढोरे, मारुती चव्हाण, नारायण ढोरे, सुरेश भंडारी, पंढरीनाथ भिलारे, बंडोपंत भेगडे, सोमनाथ काळे, वसंत भिलारे, दीपक बवरे, विजय जाधव, सुधाकर ढोरे, कल्पेश भोंडवे, किरण भिलारे आदी उपस्थित होते.
भास्करराव म्हाळसकर म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा जनाधार असलेला जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, तसेच त्याग आणि समर्पणाचे संघ संस्कार असलेल्या भाजपा मधे सर्वांना समान संधी मिळत असल्याचेही नमूद करत नूतन व मावळत्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. गुलाबराव म्हाळसकर यांनी भाजपा स्थापनेपासून ते पक्ष शिखरावर कशा पद्धतीने संघर्ष करून पोहोचला याचे विस्तृत विश्लेषण केले. तालुका कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे यांनी सूत्रसंचालन केले तर कल्पेश भोंडवे यांनी आभार मानले.