वडगाव मावळ: 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार श्रीरंग  बारणे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी उबाठाला जय महाराष्ट्र केला. उपतालुकाप्रमुख व माजी  सरपंच चंद्रकांत भोते, ओवळे गावचे  उपसरपंच समीर कराळे, शाखाप्रमुख विजय भोते, माजी सरपंच मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते,  परंदवडी शाखाप्रमुख विकास जगदाळे, गणेश भोते, कचरेवाडीचे संतोष कचरे, मधुकर कचरे, रामदास कचरे  पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काळेवाडी येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात जाहीर पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे,जिल्हासंघटक अंकुश देशमुख, तालुका प्रमुख राजेश खांडभोर,  युवासेना सचिव विश्वजित बारणे, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस,उपजिल्हाप्रमुख युवासेना दत्ता केदारी , युवासेना उपजिल्हाप्रमुख गिरीश सातकर,युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, उपतालुकाप्रमुख राम सावंत, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर,  तळेगाव  शहरप्रमुख मुन्ना मोरे, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, वडगाव शहरप्रमुख प्रवीण ढोरे, सागर वारुळे उपस्थित होते.

error: Content is protected !!