सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज – अजय भवार अध्यक्ष जनहित चारिटेबल ट्रस्ट

वडगाव मावळ:

मावळातच नव्हे तर महाराष्ट्र भर सामुदायिक मंगल परिणय सोहळे होणे ही काळाची गरज आहे. आज काल लोकं लग्नासाठी लाखो रुपयांची उधळण करतात, एकमेकांच्या चढाओढीने लग्न समारंभ पार पाडण्यासाठी पैसे कमी पडले तर जमिनी विकून लग्न करतात.

आणि याच कारणामुळे काही शेतकरी भूमिहीन झाल्याचे आपणास पाहवयास  मिळत आहे. या सर्व बाबींना कुठेतरी आळा बसावा यासाठी जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा सोहळा घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.  दरम्यान सामुदायिक मंगल परिणय सोहळा नियोजन समिती देखील जाहीर करण्यात आली. 

नवनिर्वाचित समिती खालील प्रमाणे.

अध्यक्ष – निलेश गोकुळ शिंदे, वराळे 

कार्याध्यक्ष – रुपेश उर्फ बंटी गायकवाड, कामशेत 

उपाध्यक्ष – संदीप नामदेव ओव्हाळ, नायगाव 

कार्याध्यक्ष – प्रदीप ओव्हाळ, कान्हे 

महासचिव – रवी गंगाराम भवार, बौर 

सहसचिव – शशिकांत गायकवाड, साते 

खजिनदार – भावेश थोरात, मुंढावरे 

सहखजिनदार – सिद्धार्थ भालेराव, वडगाव 

संपर्क प्रमुख – विकास शिंदे, माळेगाव 

सहसपर्क प्रमुख – महेश थोरात, वेल्हवली 

प्रसिद्धी प्रमुख – सचिन शिंदे, अजिवली व प्रफुल ओव्हाळ, शिळीम 

कायदेशीर सल्लागार – ऍड. योगेश गायकवाड, ऍड. मयूर शिंदे, ऍड. अमोल देसाई, 

विभागीय उपाध्यक्ष – 

पवन मावळ – प्रा. राहुल सोनवणे, कोथुर्णे

नाणे मावळ – संदीप बबन जाधव, वळक 

आंदर मावळ – बाजीराव ओव्हाळ 

लोणावळा शहर – 

कामशेत शहर – महेंद्र वंजारी, कामशेत 

वडगाव शहर – नितीन आल्हाट, वडगाव 

तळेगाव शहर – आनंद बबन घोडके, तळेगाव 

देहूरोड शहर – अमोल नाईकनवरे, देहूरोड 

सोशल मीडिया प्रमुख – समाधान सोनवणे,साते, रुपाली क्षीरसागर, लोणावळा 

वधू नियोजन प्रमुख – सारिका सोनवणे, कामशेत

वधू नियोजन समिती – अनिता गायकवाड, माया वंजारी, कामशेत 

संघटक – प्रवीण सरोदे, विपुल जाधव,सचिन साळवे,विशाल वाघमारे, किरण ओव्हाळ, सचिन ओव्हाळ, तुकाराम डोळस, संदीप चौरे, कुणाल घोडके, गणेश गायकवाड, चंद्रकांत थोरात,

प्रसंगी सोहळा समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश शिंदे म्हणाले की, आगामी सामुदायिक मंगल परिणय सोहळा भव्य प्रमाणात यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल त्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसार जनसंपर्क अभियान राबविण्यात येईल. 

यावेळी जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संजय गायकवाड, प्रभाकर वाघमारे, आनंद वंजारी, दलितांनंद थोरात, सचिन भवार, संदीप ओव्हाळ, ज्योती शिंदे आदी उपस्थित होते.

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट ने निवड केलेल्या या समितीवर समाजाच्या विविध सर्वच क्षेत्रातील मंडळी सामावून घेण्यात आल्याने सामाजिक एकसंघतेचे चित्र निर्माण झाले असून त्यामुळे समाजामध्ये एक उत्साह निर्माण झाल्याचे भावना आंबेडकरी समाजामध्ये व्यक्त होत आहे.

विवाहनिश्चित झालेल्या वधू-वरांनी सामुदायिक मंगल परिणयसोहळा नाव नोंदणीसाठी पालकांसह संपर्क साधावा तसेच हा भव्य सोहळा सामूहिक अर्थसंकलनातून संपन्न होत असल्याने इच्छुक दानशूर देणगीदारांनीही ट्रस्टकडे संपर्क साधावा असे आवाहन यावेळेस पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ट्रस्टचे महासचिव पत्रकार सचिन कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ट्रस्टचे कोषाध्यक्ष प्रवीण भवार यांनी मानले.

error: Content is protected !!