बबनराव भेगडे आम्हा तरूण पिढीचे आदर्श : शिवाजी असवले
तळेगाव दाभाडे:
राजकारणातील  द्रोणाचार्य ही उपाधी ज्यांना शोभून दिसते.त्यांना मावळ तालुक्याच्या राजकीय पंढरीतील गुरु असेही संबोधले जाते ,ते  बबनराव बळवंतराव भेगडे आम्हा तरूण पिढीचे आदर्शवत आहे.राजकारणात संयम फार महत्वाचा आहे आणि हीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली.धर्मनिरपेक्ष विचारांची कास धरीत समाजकारणाला सहकाराची जोड देत त्यांचे राजकारण आणि समाजकारण आम्हाला मार्गदर्शक ठरले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष, पुणे पीपल्स को- ऑपरेटिव्ह बँकचे संचालक, डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक अशा सहकारातील विविध पदांना न्याय देणारे बबनराव भेगडे मावळ तालुक्यात भाऊ या नावाने लोकप्रिय आहे.
सहकाराची जाण असलेल्या मोजक्या मंडळींच्या यादीत बबनराव भेगडे यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. भाऊचा सरकारातील व्यासंग जितका दांडगा आहे तितकचे कुशल संघटक देखील आहे. विद्यार्थी दशे पासूनच त्यांनी राजकीय चळवळीत स्वतःला झोकुन दिले. लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी घेतलेल्याला प्रत्येक भूमिकेचे बबनभाऊंनी स्वागत केले. आणि समर्थन देखील केले. एस काँग्रेसच्या युवक अध्यक्ष पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
एस काँग्रेसच्या युवक अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतलेल्या भाऊंनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण मावळ पायाखाली घातला. तळेगाव दाभाडे शहरातील राजकीय संघर्षाची जाण असलेल्या भाऊंच्या पाठीशी काँग्रेस विचारांची कित्येक घरे ठामपणे उभी होती.माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब, माजी मंत्री,मदनजी बाफना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंची.राजकीय जडणघडण झाली.
आजमितीस मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बाबींधा खडानखडा माहित असलेले नेते म्हणजे बबनराव भेगडे. अनेक राजकीय घडामोडींचे साक्षीदार असलेले भाऊ, मावळ तालुक्यातील राजकीय विश्लेषक म्हटले तरी वावगे ठरू नये. राजकारणाच्या अनेक चढउतारात त्यांनी काँग्रेस विचाराला बळ दिले. प्रसंगी त्यांनी संघर्ष केला. पण आपल्या भूमिकेपासून दूर गेले नाही. एस काँग्रेसच्या युवक अध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी अनेक जनआंदोलन केली. अंदोलक नेता अशी त्यांची प्रतिमा आजही आहे.
पक्षादेश शिरवंद्य मानून आजही जनतेसाठी भाऊ रस्त्यावर उतरलेले आपणांस दिसतील. युवक अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सहकार बोर्डाचे संचालक, जिल्हा बँकचे संचालक, उपाध्यक्ष, अध्यक्ष, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकचे संचालक, उपाध्यक्ष, अध्यक्ष असा त्यांचा सहकारातील आलेख चढता राहिला आहे. समाजकारणाला सहकाराची जोड देत भाऊंनी अनेक तरूणांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून दिल्या. डोळसनाथ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने भर दिला आहे.
सहकारातील भाऊंचा प्रवास सुरू असतानाच पक्ष संघटनेवर त्यांनी भर दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदीर्घ काळ अध्यक्ष राहिले आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. धर्मनिरपेक्ष विचाराला त्यांनी कायमच साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या विश्वासू शिलेदारांपैकी बबनराव भेगडे हे एक.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उपक्रमांना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्याची फळी उभी केली. त्यांनी उभे केलेले अनेक कार्यकर्ते आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करीत आहे. खेड्या पाडयातून आलेल्या कार्यकर्त्याची आपुलकीने चौकशी करून, त्यांच्या कामांना तातडीने प्राधान्य देणारे भाऊ यांचे कार्यकत्यांशी स्नेह जोडलेला आहे तो तशाच आहे. त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची फळी भक्कमपणे उभी आहे.
बबनराव भेगडे साहेबांची संपत्ती म्हणजे त्यांनी मिळवलेले कार्यकर्त्यांचे प्रेम. अनेक तरूण पिढीला राजकारणात दिशा देऊन यशस्वी करणारे भाऊ गुरुस्थानी आहे. बबनराव भेगडे अर्थात भाऊ यांच्या राजकारणाच्या बरोबर समाजकारणाचा ठेवा आहे. सामाजिक दायित्व संभाळून त्यांचे राजकारण आणि समाजकारण सुरू आहे. खरतर राजकारणाला याच विचारांची गरज आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी भाऊंनी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेचे स्वागत केले गेले.
राजकारणात, समाजकारणात, सहकारात रमणा-या बबन भाऊंनी माणुसकीच्या भिंती बांधल्या आहे. कोण्या ही गावातील, कोणत्याही शहरातील, कोणीही अगदी गरीब, श्रीमंत, शेतकरी, कामगार, विद्यार्थी भाऊंना सहज भेटू शकतो. त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करू शकतो. बबनराव भेगडे साहेबांच्या अनुभवातील शिदोरीने कित्येक बाका वाटणारे प्रसंगी चुटकी सरशी सुटलेली अनेक उदाहरणे मावळ तालुक्यात आपणाला पहायला मिळतील. सार्वजनिक जीवनात काम करणारे भाऊ कुटूंब वत्सल आहे. तसे नातेगोते  आणि सोयरीकीला मानसन्मान देणारे आहे.
माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस  पासून झाली
यावेळी तालुक्यातील मातब्बर नेत्याकडे घेऊन जाणारे बबनभाऊ हे पहिले नेते होते.विद्यार्थी,युवक संघटनेत काम करतानाही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.मी
मावळ पंचायत समितीची निवडणूक लढवली याही वेळी त्यांचे  मार्गदर्शन लाभले.पंचायत समितीचा पराभवाच्या वेळी भाऊंनी सावरले हेही नाकरता येणार नाही.
माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्याना कायमच पाठबळ देणारे भाऊ दोन पिढ्यांचे मार्गदर्शक आहे.आज भाऊंचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आमचे नेते, गुरूवर्य बबनराव भेगडे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
(शब्दांकन: शिवाजी चिंधू असवले ,सभापती खरेदी विक्री संघ मावळ ,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ )

error: Content is protected !!