मावळ राष्ट्रवादी शिवतारें विरोधात आक्रमक:अन्यथा आम्ही तटस्थ राहू  तालुकाध्यक्ष गणेश खांडगेंचा इशारा
वडगाव मावळ :
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा आम्हीही मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळायला बांधील नाही, आम्ही तटस्थ राहू असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष साहेबराव कारके, महिलाध्यक्षा दीपाली गराडे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, प्रभारी सुनील भोंगाडे, सुनील ढोरे, सचिन मुन्हे, राजेंद्र कुडे, शिवाजी असवले, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे,
चंद्रजीत वाघमारे, कल्याणी काजळे, पुष्पा घोजगे, पद्मावती ढोरे, वैशाली ढोरे, शैलजा काळोखे, भाग्यश्री विनोदे, मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष खांडगे म्हणाले, बारामती लोकसभा मतदासंघांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी नाहक बेताल वक्तव्य करत आहेत, त्यांना महायुतीचा धर्म पाळायचा नसेल तर आम्हीही महायुतीचा धर्म पाळायला बांधील नाही. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जात असताना वरिष्ठ नेत्यांनी घेतलेले निर्णय मान्य करून प्रत्येकाने काम करणे आवश्यक आहे; परंतुमाजी मंत्री शिवतारे हे चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांनी जाहीर माफी मागावी व बेताल वक्तव्य करणे थांबवावे अन्यथा आम्ही मावळ लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहू असा इशारा दिला.
महिलाध्यक्षा गराडे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यात महिलांचं मोठं संघटन असून त्यांनी दिलेल्या भरघोस निधीमुळे मावळचा कायापालट झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव कदापि सहन करणार नाही, असा इशारा दिला, प्रभारी भोंगाडे यांनीही शिवतारे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून सडकून टीका केली.

error: Content is protected !!