शेतकऱ्याची मुलगी झाली ग्रामविकास अधिकारी :तलाठी म्हणून जळगाव येथे निवड
पवननगर :
मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील कोथूर्णे गावातील कु.हर्षदा भाऊ दळवी हीची नुकतीच ग्रामविकास अधिकारी जळगाव ( तलाठी) म्हणून निवड झाली आहे. तिच्या निवडी बद्दल तिचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
हर्षदा ही सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या मुलीने यशाचे शिखर गाठले असल्याचे सांगताना तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. महाराष्ट्र महसुल विभागाने घेण्यात आलेल्या या परीक्षेत हर्षदाने २००  पैकी १७६ गुण संपादन करत तिने तलाठी हे पद मिळवले आहे.
हर्षदाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथूर्णे येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण वारू कोथूर्णे माध्यमिक विद्यालय येथे झाले. उच्च शिक्षण लोणावळा येथे झाले. स्पर्धा परीक्षेसाठी तीला हनुमंत हांडे सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
हर्षदाचे  आई वडील शेती करतात. सोबत जोड धंदा म्हणून पोल्ट्री फार्म चालवतात. वडिलांनी शेती करून या संपूर्ण प्रवासात मदत केली. तसेच या यशात आई वडिलांचाही सिंहाचा वाटा आहे. तर हर्षदाचे वडील हे कोथूर्णे गावचे माजी उपसरपंच होते आहे त्यामुळे आधी पासूनच घरात समाज कार्याची घरात आवड होती.आणि त्यात मुलगी ग्रामविकास अधिकारी झाल्यामुळे वडिलांचे डोळे भरून आले होते. गावक-यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी वडील भाऊसाहेब दळवी,सरपंच संदिप दळवी माजी उपसरपंच बाळासाहेब मसुरकर, भिमराव दळवी,अंकुश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य शेखर दळवी माजी चेअरमन वाघु‌ दळवी नामदेव दळवी सचिन दळवी दगडु खेंगरे, नथु दळवी,राजेश दळवी, शिवाजी निंबळे,व्हाईस चेअरमन वाघु दळवी,अंकुश सोनवणे,नथु दळवी,राजेश दळवी, शिवाजी निंबळे,व्हाईस चेअरमन वाघु दळवी उपस्थित होते.
आता माझी महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) च्या परीक्षेची तयारी चालू आहे. व मला पोलीस उपनिरिक्षक (PSI )होऊन माझे व माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तसेच माझ्या गावाचे, माझ्या भागाचे व माझ्या तालुक्याचे नाव मोठं करायचं आहे.व आपल्या देशाची सेवा करायची आहे. तसेच माझ्या सारख्या अनेक मुलींनी स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त मुलांनी येऊन जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आई वडिलांचे नावलौकिक केले पाहिजे.

error: Content is protected !!