नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ‘टेक फिएस्टा २०२४’ टेक्निकल फेस्टिवल
तळेगाव स्टेशन:
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रतिभाना चालना देण्यासाठी व विविध कौशल्यगुण विकसित करण्यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी येथे ‘टेक फिएस्टा २०२४’ नुकताच पार पडला.
  ‘टेक फिएस्टा २०२४’ अंतर्गत प्रकल्प स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ३५ पेक्षा अधिक संघांच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच प्रथम ते अंतिम वर्षात शिकणाऱ्या सुमारे १२०० हुन अधिक विध्यार्थ्यानी विविध तांत्रिक स्पर्धानमध्ये भाग घेतला. परिसरातील विविध औद्योगिक समूहानि उत्सफूर्तपणे या तांत्रिक महोत्सवाचे प्रायोजन केले.
  या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आयसरचे जेष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू , निताल कॉम्प्युटर सिस्टीम लिमिटेडचे सुदर्शन नातू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थचे अध्यक्ष मा.राज्यमंत्री संजय (बाळा ) भेगडे, सचिव संतोष खांडगे, संस्थेचे खजिनदार तसेच कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के,विश्वस्त महेश भाई शहा, चंद्रकांत शेटे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अभियांत्रिकीचे सीईओ रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये ‘सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट’ या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी स्मार्टसिटी, सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण, प्रदूषण विरहित इंधनाचा वापर असे प्रकल्प सादर केले. याप्रसंगी ‘ फास्टनर्स, पाईप्स आणि थ्री डी प्रिंटेड मॉडेल्सचे’ चे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. स्पंदन वाघमारे, डॉ. कुंदन मिश्रा, डॉ. रोहिणी हनचाटे, प्रा. सुषमा भोसले, प्रा. विवेक नागरगोजे आदी प्राध्यापकांनी केले.

error: Content is protected !!