खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी शिवाजी असवले व
उपसभापती पदी अमोल भोईरकर
वडगाव मावळ :
मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभापती, उपसभापती पदांसाठी आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सभापती पदी महायुतीचे शिवाजी असवले तर उपसभापती पदी महायुतीचे अमोल भोईरकर यांची बिनविरोध निवड झाली.
खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये १९ जागांपैकी १६ जागांवर विजय मिळवत महायुतीने एकहाती सत्ता मिळवली. आज सभापती, उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली, सहाय्यक म्हणून संघाचे सचिव किरण लोहर यांनी काम पाहिले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्ञानेश्र्वर दळवी यांच्या एकमताने असवले व भोईरकर यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला,
दरम्यान सभापती पदासाठी असवले यांचा एकमेव तर उपसभापती पदासाठी भोईरकर यांच्यासह रमेश भूरुक यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु भुरुक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापती पदी असवले यांच्यासह उपसभापती पदी भोईरकर यांचीही बिनविरोध निवड झाली. यावेळी संचालक भरत येवले, ज्ञानेश्र्वर निंबळे, बाजीराव वाजे, शहाजी कडू, रुपेश घोजगे, माणिक गाडे, किरण हुलावळे, गणेश विनोदे, प्रमोद दळवी, मधुकर जगताप, शरद नखाते, आशा खांडभोर, मनीषा आंबेकर, सुनीता केदारी तसेच एकनाथ येवले, विष्णू घरदाळे उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी असवले म्हणाले,” महायुतीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने खरेदी विक्री संघाच्या प्रगतीसाठी झटणार आहे. शेतकरी हिताला प्राधान्य देणा-या संघाच्या वाढीसाठी सकारात्मक दिशेने काम करीत राहणार आहे.

error: Content is protected !!