वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील जामा मस्जिद मधील विविध विकासकामांना सुरुवात झाली.माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने व माजी नगरसेवक राहुल ढोरे यांच्या पाठपुराव्याने अल्पसंख्याक नागरी क्षेत्र विकास विभाग अंतर्गत निधीतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील जामा मस्जिद येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन शुभारंभ मा नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मुस्लिम बांधवांच्या शुभहस्ते झाला.
जामा मस्जिद येथील कब्रस्तानातील संरक्षक भिंत व स्वच्छतागृह बांधकामांसाठी सुमारे १५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वडगाव शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आमदारांचे आभार व्यक्त केले. येत्या दोनच दिवसांत या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे.
यावेळी जामा मस्जिद चे पदाधिकारी इन्नुस मोमीन, रशीद शेख, अब्दुल शेख, अहमद सय्यद, आयुब पिंजारी, रा काॅ अल्पसंख्याक अध्यक्ष मजहर सय्यद, जावेद तांबोळी, ताहिर मोमीन आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम