
तळेगाव दाभाडे
ब्रह्मकुमारीज केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्त विश्व एकता आध्यात्मिक अभियानाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने झाला.कार्यक्रमाचे आयोजन मुलुंड सब झोनच्या संचालिका, आ. राजयोगिनी, बीके गोदावरी दीदीजी, आणि बीके लाजवंती बहनजी यांच्या मार्गदर्शनात झाले.
उद्योजक यादवेंद्र खळदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष उद्धव चितळे, माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिकासारिका सुनील शेळके, तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिकेत काळोखे, इनर व्हील क्लब अध्यक्षा संध्या थोरात, सचिव निशा पवार, मनकर्णिका महिला बचत गटाच्या अध्यक्षा विना करांडे,माजी तहसीलदार रामभाऊ माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.संस्थेचे मुख्यालय माउंट आबू येथून वरिष्ठ राजयोगीआ.बीके रामनाथ भाईजी आवर्जून उपस्थित राहिले होते. मावळ परिसरातील २५ गावांमध्ये दोन मार्चपर्यंत रॅली काढून शिव परमात्माचा संदेश देण्यात येत आहे.
संस्थेचा परिचय बीके छाया बहन यांनी केला. तर सूत्रसंचालन बीके मीनाक्षी बहन यांनी केले. तळेगाव केंद्राच्या संचालिका बीके प्रभाबहन व बीके केतन बारमुख यांनी आभार मानले.
- वडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळास्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान चे आयोजन
- मिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार – आमदार शेळके
- प्रगतीशील शेतकरी चिंधू वाळुंज यांचे निधन
- सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेला अद्ययावत इन्टरॲक्टीव्ह विज्ञान प्रयोगशाळा
- जीवनगाथा बहिणाबाईंची’ : १९ एप्रिलला बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील नि:शुल्क रंगमंचीय आविष्कार




