घाटाचा मानकरी किताब पटकाविलेला खंड्या बैलाचा दशक्रिया:जाधव व जगताप कुटूबियांच्या डोळ्यात अश्रु
वडगाव मावळ:
खंड्यांचा दशक्रिया विधी म्हणजे ऋणातुन मुक्त होण्याचा मार्ग आहे असे मत हभप सतिश महाराज काळजे यांनी नाणोली येथे व्यक्त केले.
महापौर राहुल जाधव बैलगाडा संघटनेचा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेला खंड्या बैलाच्या दशक्रिया विधी ते बोलत होते.बैलगाडा मालक निष्पक्षपणे व निस्वार्थीपणे प्रेम करायला शिकवते.राहुल जाधव बैलगाडा संघटनेचा लाडका असलेला बैल खंड्या चे नुकतेच निधन झाले .या निधनानंतर संघटनेच्या व बैल मालकांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने या बैलाच्या दशक्रिया विधी करण्यात आला.तसेच त्याचे स्मारक बांधण्यात आले.
खंड्यांमुळे आमच्या संघटनेच्या व आमच्या कुटुंबाच्या नावलौकिकात भर पडला.खंड्या ने घाटाचा राजा, महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेला एक उमदा रुबाबदार बैल आमच्या कुटुंबात आला. आम्ही त्याचा घरातील सदस्यांसारखा सांभाळ केला.तो असा अचानक वयाच्या साडेपाच वर्षी आम्हाला सोडून जाईन असं वाटल सुद्धा नाही. तो गेल्याने आमच्या कुटुंबाच व संघटनेच फार मोठ नुकसान झाले.
हे नुकसान भरून येणार नाही. यामुळे घरातील व्यक्ती गेल्यानं त्यांच्या सारखेच विधी करण्याचा आम्ही निर्णय घेतला व खंड्यांचा दशक्रिया विधी करण्यात आला व स्मारक बांधण्यात आल्याचे माजी महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे , माजी उपसरपंच प्रशांत भागवत ,विनायक मोरे , राहुल गोरे, आनंद वर्पे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, सरपंच मोनिका स्वप्निल शिंदे , विकास नायकवडी, माऊली पिंगळे, माऊली तळेकर ,साहेबराव अढळराव, संतोष जाधव , राजेंद्र करपे,निलेश बोराटे ,निवृत्ती बोराटे, विशाल पवार ,तुषार भालेकर,स्वप्निल बाळासाहेब जगताप ,सागर बाळासाहेब जगताप, सुवर्णा रविंद्र जाधव, मंगल राहुल जाधव, मीना बाळासाहेब जगताप,बाळासाहेब भिकाजी जगताप, राजेंद्र करपे,निवृत्ती बोराटे, रवींद्र जाधव, राहुल सस्ते यांच्यासह दशक्रिया विधी ला आयोजित प्रवचन सेवेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी महापौर राहुल जाधव म्हणाले,” खंड्या बैल जाणे हे आमच्यासाठी खूप वेदनादायक आहे.खंडयाचा पुर्नजनम झाला तर.तो आमच्याच कुटूंबात व्हावा. खंडयाचा सर्वाना जिव्हाळा होता.तो कायम लक्षात राहील. त्याच्या प्रती असणा-या सद्भावना जपण्यासाठी दारातच स्मारक उभारले आहे.
बाळासाहेब जगताप म्हणाले ,”दावणीला खंड्या सारखी अजूनही शर्यतीची बैल आहे .गोठ्यात आलं की लाडक्या खंड्याची आठवण येत राहणार.त्याने अनेक किताब मिळवले त्याची आठवण राहावी म्हणून दारातच स्मारक उभं केले.
मीनाताई बाळासाहेब जगताप म्हणाल्या,” खंड्या याला पोटच्या मुलासारखा सांभाळला .स्पर्धेला धावायला जाताना तो सहजपणे टेम्पो बसायचा. त्याने खूप बक्षीस मिळून दिली याचा आनंद असला सतरी तो जाण्याने मोठं दुःख आहे.
मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अण्णासाहेब भेगडे म्हणाले,” शर्यतींच्या बैलांच्या किमती लाखोंच्या घरात गेल्यात गेल्या आहेत. बैलगाडा शौकिनांनी आणि स्पर्धेच्या आयोजकांनी बैलगाडा शर्यती करताना योग्य ती खबरदारी घ्यावी .बैलगाडा शर्यतीने मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. मात्र गोठ्यातील बैल जेव्हा निधन पावतो तेव्हा त्याचे दुःख कुटुंबातील सदस्य जाण्याइतकेच आहे.
जगताप व जाधव कुटुंबियांच्या निवासस्थानी आजच्या दशक्रियेलाच सगळे बैलगाडा मालक बैलगाडी शौकीन उपस्थित होते असे नाही तर गेले दहा दिवस वेगवेगळ्या मंडळींनी या कुटुंबीयांच्या घरी जाऊन हळहळ व्यक्त करीत दुःखात सांत्वन केले.
महापौर राहुल दादा जाधव बैलगाडा संघटनेच्या वतीने दशक्रिया विधीचे आयोजन केले. सर्व धार्मिक विधी परंपरेने साजरे करण्यात आले. प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. तसेच अन्नदानही झाले. मावळ तालुक्यासह खेड जुन्नर आंबेगाव शिरूर नगर मुळशी या तालुक्यातून बैलगाडा मालक बैलगाडा शौकीनांनी खंड्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली.
- महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा केला निर्माण :डॉ. श्रीपाल सबनीस
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन