वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध
मावकर परिवाराला सरपंचपदाचा मान
कार्ला:
मावळ तालुक्यातील आई एकविरादेवी पायथ्याशी असणा-या वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी वर्षा संतोष मावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंचपदाची जागा रिक्त असल्याने कार्ला मंडल अधिकारी आशा धायगुडे यांंच्या मार्गदर्शनाखाली वेहरगाव ग्रुपग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.
सरपंचपदासाठी निर्धारीत वेळेत मावकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी धायगुडे व सहायक अधिकारी ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी मावकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी प्रभारी सरपंच काजल पडवळ,सदस्य शंकर बोरकर,राजु देवकर,सुनिल येवले,अनिल गायकवाड,सदस्या पुजा पडवळ,योगिता पडवळ,ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन वर्षा मावकर यांचा सत्कार केला.
ग्रामपंचायत स्थापने पासून दहिवली येथील मावकर परिवाराला उपसरपंचपद मिळत होते मात्र सरपंचपद हुलकावणी देत होते. प्रथमताच सरपंचपद वर्षा मावकर यांंच्या रुपाने मावकर परिवाराला मिळाल्याने मावकर परिवाराने आनंदउत्सव साजरा केला.
यावेळी माजी चेअरमन भाऊसाहेब मावकर माजी सरपंच सचिन येवले,गणपत पडवळ,चंद्रकांत देवकर राष्ट्रवादी उपाध्यक्ष तानाजी पडवळ, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ,पांडुरंग मावकर,विष्णू मावकर,शांताराम मावकर,किरण येवले,अशोक पडवळ,मोरेश्वर पडवळ,नवनाथ पडवळ,रामचंद्र येवले,गणेश मावकर,संतोष मावकर,शाम गायकवाड,किसन मावकर,गणपत येवले,लक्ष्मण धुमाळ,भगवान पडवळ,मारुती मडके,दिनेश टिळेकर,संतोष गायकवाड,दिपक मावकर,जितु मावकर यांंच्यासह वेहरगाव दहिवली ग्रामस्थानी मावकर यांचे अभिनंदन केले.
सरपंचपदी निवडझाल्यानंतर मावकर म्हणाल्या ,”वेहरगाव दहिवली गावाच्या विकासासाठी तसेच श्री.एकविरादेवी भाविक भक्तांना सुखसुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार.
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे