विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाने भोंडे हायस्कूलचे स्नेहसंमेलन संपन्न
लोणावळा:
येथील अॅड . बापूसाहेब भोंडे हायस्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले बुधवार दि. २० डिसेंबर व गुरुवार दि. २१ डिसेंबर असे सलग दोन दिवस प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाने आलेल्या पाहुण्यांची व पालकांची मने जिंकली.
दोन्ही दिवस आलेल्या प्रमुखपाहुण्यांच्या हस्ते सरस्वती व नटराजाचे पुजन करण्यात आले. पहिल्या दिवशी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख तर दुसर्या दिवशी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापिका माधवी थत्ते यांनी पाहुण्यांचे स्वागत करत प्रास्ताविक मांडले तर विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव राधिका भोंडे यांनी शाळेचा मागील वर्षाचा आढावा स्क्रीन च्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांना व पालकांना सांगितला.
विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन यश संपादन करावे यासाठी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे नारायण भार्गव ग्रुपचे सर्वेसर्वा नारायण भार्गव यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते.
यावेळी विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी ,विश्वस्त अरूण मोरे ,काचरे काका, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, संजय वीर, आनंद नाईक ,प्रकाश आढाव संजय पुजारी , लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे ,पत्रकार प्रशांत पुराणिक, , संजय पाटील , उद्योजक राजेश मेहता, शाळेच्या माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ति गव्हले, प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक शशिकला तिकोणे यांसह पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
दिप्ती पाठक ,नंदिता समादार व रूक्साना खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शाळेतील वर्ष भर केलेल्या कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो यासाठी पूर्व प्राथमिक विभागातून रूक्साना खान प्राथमिक विभागातून दिप्ती पाठक तर माध्यमिक विभागातून नंदिता समादार त्याचबरोबर उत्कृष्ट लेखनिक म्हणून सुवर्णा देशमुख यांची निवड करण्यात आली तर शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये अतुल भालेराव व वनिता वाघमारे यांची निवड करण्यात आली.