पवना शिक्षण संकुलाला युपीएल कंपनीनच्या माध्यमातून ५० लाख रुपयांच्या देणगीतून बांधून देण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण पवनानगर ता.२२- यु.पी.एल लिमीटेड कंपनी व पवना प्राॅपर्टी असोसिएशनच्या निधीतून पवना विद्या मंदिर शाळेसाठी येथे सुमारे ५० लाख रुपये खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिले. या स्वच्छतागृहाचे लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.
पवना शिक्षण संकुल हे पवनमावळातील बालवाडी ते ज्युनिअर कॉलेज शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा असून या पवना शिक्षण संकुलात १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.परिसरातील नामांकित पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या सामाजिक उत्तरदायित्वातून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून देण्यात आली आहे.
या स्वच्छतागृहाचे लोकार्पण आज उद्योजक पद्मभूषण रज्जू श्रॉफ व सॅन्ड्रा श्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन करुन संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे हे होते.
यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, सध्या समाजामध्ये स्वच्छतेबाबत जागृती होत असते त्याचाच आधार घेऊन ग्रामीण भागातील शाळांसाठी पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या सामाजिक उत्तरदायित्वातून सुसज्ज असे स्वच्छतागृह उपलब्ध झाली आहे या दोन्ही सामजिक संस्थेचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे वाखाणण्याजोगे आहे
यावेळी कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ राहटणी चे संस्थापक वसंत कोकणे, अध्यक्ष अमोल दापूरकर, संस्थेचे जेष्ठ संचालक दामोदर शिंदे,सोनबा गोपाळे, महेशभाई शहा,शंकरराव नारखेडे,पवना शिक्षण संकुलाचे पालक सदस्य सुनिल भोंगाडे, पवना प्रॉपर्टी असोसिएशन मॅनेजर रोहितलाल श्रीवास्तव, मावळ तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शोभाताई वहिले,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका अंजली जांभूळकर, कालेच्या उपसरपंच छाया कालेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष काशिनाथ निंबळे, मुख्याध्यापक पांडूरंग ठाकर,शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, विश्वनाथ जाधव, करूंजचे सरपंच सदाशिव शेंडगे, माजी सरपंच शंकर लोखंडे,अभय गांधी कालेचे केंद्रप्रमुख पांडुरंग डेंगळे,वारुचे केंद्रप्रमुख राजेश राऊत,मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक नितीन वाघमारे, संजय ठुले,गोरख जांभूळकर, धोंडीबा घारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना श्रॉफ म्हणाले की,पुढील काळात पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या माध्यमातून पवना परिसरातील डिजीटल शाळा तसेच पर्यावरण पूरक शाळा करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत केली जाईल.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले सुत्रसंचालन रोशनी मराडे,वैशाली वराडे व भारत काळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांनी मानले.

error: Content is protected !!