पवनानगर
काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता विजय कालेकर व नामदेव अर्जुन कालेकर यांची बिनविरोध निवड
मावळ तालुक्यातील बहुचर्चित काले विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता विजय कालेकर व नामदेव अर्जुन कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रिक्त झालेल्या दोन संचालक मंडळाच्या पदासाठी दि.१३ डिंसेबर रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार सभासद कविता विजय कालेकर व नामदेव अर्जुन कालेकर यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
यावेळी निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी दोन अर्ज आल्याने दोन संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी निवडणूक अधिकारी आर.के.निखारे व सचिव धनंजय कालेकर सहसचिव पांडुरंग गावडे यांनी काम पाहिले.
यावेळी चेअरमन चिंधु गजानन कालेकर,लक्ष्मण भालेराव,अंकुश शेडगे, बाळु दुदांजी कालेकर,ज्ञानेश्वर आढाव,दत्तात्रय विठ्ठल कालेकर, सुनिता कालेकर,सरपंच खंडू कालेकर,भाऊ ठाकर, हिरामण आढाव,बबन कालेकर,जितेंद्र कुडे,बाळु गोपाळ कालेकर, दत्ता किसन कालेकर,दिपक रणपिसे,देवानंद भालेराव, अनिल भालेराव,बाळु पवार,यांच्या सह सर्व संचालक उपस्थितीत होते.निवडीनंतर गुलालाची उधळण करीत आंनदोत्सव साजरा करण्यात आला आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस