कान्हेत स्व.पै.पंढरीनाथ हरिभाऊ सातकर प्रतिष्ठान आयोजित बैलगाडा छकडी स्पर्धेचे आयोजन
वडगाव मावळ:
स्व.पै.पंढरीनाथ हरिभाऊ सातकर प्रतिष्ठान आयोजित पै. किशोर पंढरीनाथ सातकर युवा मंच यांच्या सौजन्याने कान्हे ता.मावळ येथे भव्य बैलगाडा छकडी स्पर्धेचे रविवार ता.१७ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य संयोजक मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांनी दिली.
आमदार सुनिल शेळके, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुरज चव्हाण,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती बाबूराव वायकर यांच्यासह मावळातील लोकप्रतिनिधी,राजकीय पक्षांचे पदाधिकारी,बैलगाडा मालक व शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
कान्हे येथील राम कृष्ण हरी गार्डन मंगल कार्यालय जवळच्या ‘ मावळ केसरी घाट ‘ येथे रविवारी ता.१७ सकाळी ७ वाजता बैलगाडा छकडी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्याला ५१ हजार रुपयाचे बक्षीस आहे.तर दुसऱ्या क्रमांकाला ४१ हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकाला ३१ हजार रुपये,चौथ्या क्रमांकाला २१ हजार रुपये ,पाचव्या क्रमांकाला ११हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकाला ९ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे .
पहिल्या ते सहाव्या फायनल नंबर साठी प्रत्येकी एक चषक भेट देण्यात येणार आहे. मेगा फायनलसाठी अनुक्रमे दुचाकी व कुटी मशीन बक्षीस देण्यात येणार आहे.याशिवाय पहिल्या पाच क्रमांकासाठी अनुक्रमे सोन्याची अंगठी, डबल डोर फ्रीज, एलईडी टिव्ही,वाॅशिंग मशीन,कुलर या स्वरूपाची बक्षीस असणार आहेत.
या स्पर्धेसाठी उपस्थित असणा-या प्रेक्षकांसाठी आकर्षक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.यातील पाच भाग्यशाली विजेत्यांना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.टोकन पद्धतीने लकी ड्रॉ काढले जाणार आहेत. छकडी चालकांसाठी आयुष्यमान योजनेअंतर्गत पाच लाख रुपयाच्या आरोग्य विमा कार्डचे वाटप केले जाणार आहे.
स्पर्धेसाठी नियम व अटी बंधनकारक असणार आहेत.स्व. पै. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर प्रतिष्ठान ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस मावळ ,किशोर सातकर युवा मंच, महिंद्रा लॉजिस्टिक ,माथाडी कामगार महिंद्रा सीआयई, सुप्रीम ,महिंद्रा स्टील ,सेपेक्स महिंद्रा, कंपोझिट, शिवप्रसाद मित्र मंडळ,गुरुदत्त मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, ओंकारेश्वर मित्र मंडळ ,माऊली ग्रुप, मोरया मित्र मंडळ ,संघर्ष मित्र मंडळ ,ओंकार मित्र मंडळ, धम्मदीप मित्र मंडळ ,बैलगाडा संघटना,समस्त ग्रामस्थ कान्हे हे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटत आहे.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित