‘देव कुठेतरी स्वर्गात,दानव कुठेतरी पाताळात व मानव पृथ्वीवर’ असा प्रकार प्रत्यक्षात नाही.माणसामध्येच देव-दानव-मानव असतात.कृष्ण हा देव होता तर त्या कृष्णाचा मामा कंस दानव होता व तोच कृष्ण ज्याच्या घरी वाढला तो नंद मानव होता.म्हणून माणसे ज्या पद्धतीने विचार करतात, बोलतात व आचार करतात त्यावर माणसे कशी होणार हे ठरत असते.
दुसऱ्यांच्या दुःखाने सुखी होतो तो दानव, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो मानव व दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतो तो देव जाणावा.
विकार ज्यांना आवरता येतात ते मानव, ज्यांना आवरता येत नाहीत ते दानव व ज्यांच्या वृत्तीवर विकार उठतच नाहीत ते देव जाणावेत.
एकमेकांना एकमेकांनी पाडण्याच्या प्रयत्नात सर्वच कोसळतात तर त्याच्या उलट एकमेकांना एकमेकांनी आधार दिल्याने सर्वच यशस्वी होतात.
अक्कलशून्य माणसे दुसऱ्यांची निंदा-नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात, कारण ‘निंदा करणे’ ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नाही.
‘तुम्ही इतरांचे भले कराल तर तुमचे भले होईल ,तुम्ही इतरांचे वाटोळे कराल तर तुमचे वाटोळे होईल’, हा निसर्गाचा अटळ नियम आहे.
मूर्ख माणसे समस्या निर्माण करतात, तर सूज्ञ माणसे त्या समस्या सोडवितात.
सद्गुरू श्री वामनराव पै.
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन
- मावळात बैलगाडा मालकाचा खून
- हक्काची अंमलबजावणी करताना कर्तव्याची जाण आवश्यक : ॲड. प्रकाश साळशिंगीकर