बालदिन उत्साहात साजरा
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने मस्ती की पाठशाळा रावेत येथे बालदिन साजरा करण्यात आला.या शाळेत विटभट्टी कामगारांची मुले शिकत  आहेत.
एकुण ४५ मुलांमध्ये केक कापून बालदिन साजरा केला.नंत्तर मुलांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. सोबत सर्वांना नाष्टा वाटप केला.याप्रसंगी संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर मेरुकर यांनी बालदिनाचे महत्त्व पटवून सांगितले.
प्रास्तविक डॉ.मोहन गायकवाड यांनी केले. आभार डॉ. मृणाल फोंडेकर यांनी मानले.संस्थेच्या संस्थापिका प्राजक्ता रुद्रवार यांनी संयोजन करण्यास मदत केली.यावेळी शब्बीर मुजावर, मनोहर कड, गोविंद चितोडकर, सायली सुर्वे ,संध्या स्वामी, सुनिता गायकवाड ,इशिता गायकवाड, भरत शिंदे उपस्थित होते.

error: Content is protected !!