श्रमिकांनी घेतलाय सर्वांगीण विकासाचा ध्यास
पिंपरी:
भोसरी औद्योगिक वसाहतीतील एस ब्लॉकमधील प्लॉट क्रमांक १३४ वर प्रिसिजन इंजिनिअरिंग वर्क्स ही कंपनी कार्यरत आहे. येथील सुमारे १७५ श्रमजीवी कष्टकरी आपली उपजीविका चालवीत असतानाच त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘आओ जिंदगी बनाये’ हे अभियान सुरू केले आहे.
व्यक्तिसमूहाने आपल्या हाताच्या बळावर उंच उचलून धरलेला पृथ्वीचा गोल हे या अभियानाचे बोधचिन्ह आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या स्तरावर सर्वांगीण विकास साध्य व्हावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. कार्यकौशल्य, आरोग्य, पर्यावरण विकास आणि संवर्धन यासाठी विविध उपक्रम या अभियानांतर्गत राबविण्यात येतात.
नुकत्याच झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या उपक्रमात या सर्व १७५ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आपल्या कंपनीतील स्वच्छतेबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील सुमारे २२ कंपन्यांमध्ये जाऊन त्यांना स्वच्छता उपक्रमात सहभागी करून घेत दोन टन कचरा संकलित केला.
यावेळी प्रिसिजन इंजिनिअरिंग वर्क्सचे कार्यकारी संचालक असिफ पठाण, मनुष्यबळ विकास विभागाच्या बिजू पाटील आणि नीलिमा डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. सर्वांनी स्वच्छतेचे नियम पाळण्याची सामूहिक शपथ घेतली; तसेच “इतनी शक्ती हमें देना दाता…” ही प्रार्थना म्हटली. या उपक्रमामुळे औद्योगिक परिसरात सामाजिक सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम