मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने रास दांडिया गरबा पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
वडगांव मावळ:
सामाजिक बांधिलकी जपत मोरया महिला प्रतिष्ठान शहरातील महिला भगिनींसाठी विविध उपक्रम राबविण्यात प्रयत्नशील असते. असाच एक अनोखा उपक्रम नवरात्री सणानिमित्त रास दांडिया गरबा या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
मोरया महिला प्रतिष्ठान नेहमीच महिलांच्या मनावर संस्कार आणि मनगटात साहस निर्माण करते असते.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा ते कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं या उद्देशाने अतिशय अल्प दरात रास दांडिया गरबा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
दिनांक ९ ते १३ ऑक्टोबर या पाचदिवसीय गरबा प्रशिक्षणास पुण्यातील व्हि जे फिटनेस क्लब चे सुप्रसिद्ध प्रशिक्षक अजिंक्य बन्सी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तरी वडगाव शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले आहे.
यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका आणि प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!