अहंकार म्हणजे राक्षस असून माणसाच्या सर्व समस्या निर्माण करण्यास तोच कारणीभूत ठरत असतो.अहंकार डोळ्याला दिसत नाही व स्वतःजवळ तो आहे हे कळतही नाही.सूक्ष्म स्वरूपात अहंकार असतो,तसा तो स्थूल रूपातही असतो.’मी अमूक’ हा सूक्ष्म अहंकार तर ‘मी असा’ हा स्थूल अहंकार.अहंकार गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही व समाधान मिळत नाही.
अहंकार नाश तेथे सर्व सुखाचा वास. प्रत्यक्षात मात्र माणसे अहंकाराचा फुगा कळत नकळत फुगवीतच असतात.
अहंकाररहित होणे म्हणजे परमार्थ तर अहंकार भरीत होणे म्हणजे संसार.
अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार असून या अहंकाराचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा व सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही.
भ्रमाला आलेला आकार म्हणजे अहंकार तर ब्रह्माला आलेला आकार म्हणजे नमस्कार.
‘मी अमूक’ या कल्पनेचा स्वीकार म्हणजे अहंकार
अहंकाररहित शरीर ही श्रीहरीची बासरी होय.
सर्वात मोठे पाप व सर्वात मोठा ताप म्हणजे मूर्ख व अहंकारी माणसाशी संबंध येणे हा होय.
अहंकार फस्त करून केवळ फक्त होऊन रहाणे हा भक्त होण्याचा उत्कृष्ट मार्ग.
“आपण जी सेवा करतो ती दुसऱ्यासाठी” ही कल्पना माणसाला अहंकारी बनविते, याच्या उलट “आपण जी सेवा करतो ती आपल्याच कल्याणासाठी’ ही भावना त्याला प्रेमळ बनविते.
मूर्खपणाला आलेला आकार म्हणजे अहंकार.
अहंकार हा आहे कलिकाळाचा फास म्हणून अहंकार नाश तेथे सर्वसुखाचा वास.
अहंकार फस्त झाला की जो उस्तो नो भक्त.
पायात रुतलेला काटा ज्या प्रमाणे सारखा सलत रहाता त्याप्रमाणे जीवनात रुतलेला अहंकाराचा काटा माणसाला सदैव छळत राहातो.
सर्व दु:खावा आकार देणारा तो अहंकार.
प्रभुच्या दिशेने जी गती ती प्रगती, तर अहंकाराचे पुच्छ वाढत रहाणे हि पुच्छगती.
अहंकाराच्या आधीन झालेला मानव निसर्गाला जिंकण्याच्या बढाया मारतो परंतु हे तो विसरतो की,स्वतःमाणूस हा मुद्धा निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे.
तत्त्वतःअहंकार हा देवाचा हुंकार आहे.
विश्वाच्या अफाट पसाऱ्याकडे नीट लक्ष दिले तर आपण किती क्षुल्लक आहोत हे सहज लक्षात येते आणि आपला अहंकार विरून जातो.अहंकार गेला की,देव आला, हे निश्चित.
‘माझी इच्छा’ या अहंकारावर आकाराला आलेला प्रपंच म्हणजे संसार,तर ‘देवाची इच्छा’ या भावावर चाललेला प्रपंच म्हणजे परमार्थ.
जीव आणि देव यांच्यामध्ये अहंकाराचा विलक्षण पर्वत उभा आहे.
जो अहंकारी आहे तो पूर्ण अज्ञानी असे खुशाल समजावे.
अहंकाराच्या अधिष्ठानावरच विश्वाचा अलंकार साकार झाला आहे.
अहंकाराचा विस्तार या नांव संसार.
नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे अहंकाररूपी नाण्याची एक बाजू आहे. कली व दुसरी बाजू आहे काळ.
सद्गुरू श्री वामनराव पै
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन