गुरु भगवंतांचा चातुर्मास अनोखी पर्वणी :डॉ .मंजुळा मंगलप्रभात लोढा
तळेगाव दाभाडे:
पियुषचंद्र विजयजी म.सा., रजतचंद्र विजयजी म. सा. व प्रीतीयश विजयजी म.स.या गुरु भगवंतांचा चातुर्मास तळेगाव दाभाडे शहरात होणे म्हणजे तळेगावकरांना अनोखी पर्वणीच असे गौरवोद्गार  कवियत्री व साहित्यिक डॉ.मंजुळा मंगलप्रभात लोढा यांनी काढले.
तळेगाव शहरात गुरु भगवंतांच्या आशीर्वाद घेण्यासाठी लोढा आल्या होत्या,त्यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.येथील जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये चातुर्मास निमित्त विराजित गुरु भगवंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी व त्यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या सुविद्य पत्नी साहित्यिक व कवयित्री डॉ.मंजुळा मंगलप्रभात लोढा आल्या होत्या.
डॉ. लोढा यांचे सामाजिक कार्य फार मोठे असून गोरगरिबांना मदत करण्यासाठी व गोशाळेसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या मंजुळाबेन यांनी आजपर्यंत ९ मंदिरे बांधून पूर्ण केली असून ४ मंदिराची प्राणप्रतिष्ठा आता होण्याचे बाकी आहे असे पियुषचंद्र विजयजी म सा.यांनी सांगितले.
रजतचंद्र विजयजी म.सा. यांना गुरु भाऊ म्हणून मानलेल्या डॉ मंजुळाबेन यांची अतिशय साधी राहणे त्यांची आहे असे रजतचंद्र विजयजी म.सा. यांनी सांगितले
यावेळी त्यांचा श्री.जीरावाला पार्श्वनाथ जैन मंदिर संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री.जीरावाला पार्श्वनाथ जैन मंदिराचे विश्वस्त,श्रावक व श्रावीका उपस्थित होते.

error: Content is protected !!