गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड मनपा डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांनी केलेल्या पर्यावरणपुरक गणेशोत्सव आवाहनाला प्रतिसाद देत दिड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रमास भाविकांचा १००% प्रतिसाद मिळाला.
गतवर्षी पेक्षा जास्त मुर्तीचे दान मिळाले.मागील वर्षी याच दिवशी ७०० मुर्तीचे दान मिळाले होते आणि यावर्षी ७१८ मुर्तीचे दान मिळाले आणि ३.५ टन निर्माल्यदान मिळाले. यावर्षी  सर्वांनी खुप नियोजबध्द आणि चांगले सहकार्य मिळाल्यामुळे हे शक्य झाले.
ब प्रभाग अधिकारी  अमित पंडीत आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.सभासद घेतलेले सभासद भरत शिंदे,विश्वास राऊत ,प्रभाकर मेरुकर, संध्या स्वामी, सोमनाथ पतंगे, रामदास सैंदाणे, दिलीप घाटोळ ,सुनंदा निक्रड, मोहन गायकवाड,रंजना जोशी, विकास हाटे , वैशाली हाटे ,नम्रता बांदल, सुधाकर खुडे, धनाजी सावंत ,पल्लवी नायक यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!