नामाचा नंदादिप
होतो मी परदेशी ।।
फिरत आलो देवगांवाशी ।।
सहजावस्था ही जीवाची सहज अशी अवस्था होय. वास्तविक ही जीवाची श्रेष्ठ, अत्यंत उच्च अवस्था होय. अशा उच्च अवस्थेतून जीव केवळ गंमत म्हणून एक एक ‘पायरी’ उतरत खाली येतो.जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात, —
“होतो मी परदेशी। फिरत आलो देहगांवासी”
परंतु …. 覆 त्या उच्च अवस्थेवर आरूढ होण्याचा जेव्हा जीव प्रयत्न करतो तेव्हा मात्र हतबुद्ध होण्याची त्याच्यावर पाळी येते.
एकदा एका कोळ्याची अशीच स्थिती झाली, …
*एका कोळियाने एकदा आपुलें।*
*जाळे बांधियेले उंच जागी।।*
*तेथुनी सुखाने खाली तो आला।*
*परी मग झाला कष्टी बहु।।*
✡️ त्या कोळ्याने उंच जागी जाळे बांधले व तेथून तो केवळ मौज म्हणून खाली उतरला. परत वर जाण्याच्या प्रयत्नात मात्र तो अनेकदा खाली पडला व *शेवटी मोठ्या शिकस्तीने पूर्वस्थळी जाण्यात यशस्वी झाला.*
* जीवाचे असेच झाले आहे.* उंच अशा सहजावस्थेत तो वास करीत होता; परंतु ती अवस्था सोडून तो जो खाली आला *तो त्याला परत पूर्वस्थळी जाणे आता कठीण होऊन बसले आहे.*
➡️ एकेक पायरी उतरत जीव खाली कसा आला, ते थोडक्यात पाहू.
*覆”उच्च सहजावस्था”*
(१) *पहिली पायरी :* “द्रष्टा-दृष्य-दर्शन”, या अवस्थेत तो सर्व इंद्रियांतून *”पाहतो”* (Perceives), *नुसता पाहतो.*
(२) *दुसरी पायरी :* “ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान”. या अवस्थेतील जीव इंद्रियांतून जे पाहतो *त्याची द्वंद्वात्मक चिकित्सा करतो.* चांगले-वाईट, सुरूप-कुरूप, बरे-बुरे किंवा हे अमुक व ते तमुक वगैरे,
(३) *तिसरी पायरी :* “ध्याता-ध्येय-ध्यान”. या अवस्थेत जीव त्याला जे अनुकूल ते कसे मिळवायचे व प्रतिकूल ते कसे टाळायचे याचे चिंतन करीत राहतो.
(४) *चवथी पायरी :* “कर्ता-कार्य-कर्म”. या अवस्थेतील जीव अनुकूल प्राप्त करून घेण्यासाठी व प्रतिकूल ते टाळण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करू लागतो.
(५) *पांचवी पायरी :* “भोक्ता-भोग्य-भोग”. या अवस्थेत जीव इंद्रियांच्या द्वारा विषयाचा भोग घेतो.
* जीव आता ”भोक्ता” या शेवटच्या पायरीवर आहे.* परत सहजावस्थेत आरूढ होण्यासाठी वरील चार पायऱ्या चढून जाणे आवश्यक आहे. अखंड नामस्मरणाच्या बळावर जीवाला हे शक्य झाले आहे.
*कसे ते आता आपण थोडक्यात पाहू, ..*
✅ अखंड नामस्मरणाचा आवडीने अभ्यास करता करता *नामधारकाचे विषयावरील लक्ष उडते व ते नामावर स्थिर होऊ लागते.* विषय व विषयभोग यांचे महत्त्व नामधारकाला वाटेनासे होते व त्याला नाम अधिकाधिक गोड लागू लागते.
✅ अशा रीतीने साधक *”भोक्ता”* या पायरीवरून *”कर्ता”* या पायरीवर आरूढ होतो. ”कर्ता” या पायरीवर नामस्मरण चालू असताना *साधकाचे लक्ष नामस्मरण करणाऱ्या ”मी” वर स्थिर होऊ लागते.* नामस्मरणाचा आवडीने अभ्यास चालू असता *हा ”मी” देह नसून, प्रत्यक्ष देवच “मी” म्हणून राहिलेला आहे,* असा बोध प्रभुकृपेने साधकाच्या अंत:करणात उमटू लागतो.
*असो रूपक हे तो ईश्वरू।*
*सकल भूतांचा अहंकारू।।*
*पांघरोनी निरंतरू। उल्हसत असे।।*
*”मी” ला आड करून साक्षात् देवच सर्व इंद्रियांतून देहद्वारा प्रकट होऊन राहिलेला आहे”,* असा बोध जसजसा साधकाच्या अंत:करणात ठसू लागतो *तसतसा त्याला देवाचा ध्यास लागू लागतो.* अशा रीतीने साधक *”ध्याता”* या पायरीवर आरूढ होतो.
➡️ या पायरीवर नामस्मरण चालू असता *भगवंताची कृपा होऊन साधकाला आपल्या “स्वरूपाचा” साक्षात्कार होतो* म्हणजेच *त्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होते* (Knowledge by intuition) *ऋतुंभरा प्रज्ञा* व …..
覆 साधक *”ज्ञाता”* या पायरीवर आरूढ होतो. या पायरीवर नामस्मरण चालू असताना *साधकाला सर्वत्र ”मी” च कसा भरून राहिलेला आहे याची प्रचीती येऊ लागते.*
*तुका म्हणे जे जे दिसे।*
*ते ते वाटे मी ऐसे।।*
या अवस्थेत साधक जीवनाकडे व जगाकडे केवळ *”खेळ”* या दृष्टीने
पाहू लागतो.
*तुका म्हणे आतां खेळतो कौतुकें।*
*झाले तुझे सुख अंतर्बाही।।*
*तुका म्हणे उगे रहावें।*
*जे जे होईल ते ते पहावें।।*
अशा रीतीने नामधारक *”द्रष्टा”* या पायरीवर आरूढ होतो. या पायरीवर नामस्मरण घडत असताना *साधक आपल्या “मूळच्या अवस्थेत” “जीवनमुक्त अवस्थेत” प्रवेश करतो.*
*सदा नामघोष करूं हरिकथा।*
*तेणें सदा चित्ता समाधान।।*
*सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार।*
*आनंदें निर्भर डुल्लतसो।।*
*असो ऐसा कोठे आठवची नाहीं।*
*देहीच विदेही भोगू दशा।।*
*तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप।*
*लागोनेदि पाप पुण्य अंगा।।*
या उच्च अवस्थेत नामधारक *सर्वात असतो पण नसतो कशातच.* “तो सर्व करतो असे दिसते पण करीत नाही काहीच”.
*लागोनेदि पाप पुण्य अंगा*
*हरिच्या नामे हरिचे भक्त।*
*होवून ठेले जीवन मुक्त।।*
सद्गुरू श्री वामनराव पै
️
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन