कुसवली:
आंदर मावळ वासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. आंदर मावळातील कुसवली पठार ,कांब्रे पठार,कुसूर पठार
जगाच्या नकाशावर झळकणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यातील हे पठार जागतिक पर्यटनाचे केंद्र बनवण्या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत कुसवली पठाराला जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याचा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.या पठाराची भुरळ सा-या मावळ वासीयांना आहे. पठारावर अंजन,करवंदी आणि जांभळाची हजारो झाडे आहे. तर पठारावरील शेकडो एकर माळरान आहे. हिरव्यागार वनराईत नटलेले पठार कास पठारा पेक्षा कमी नाही. या निसर्ग सौंदर्य सोबत पुणे ,नवी मुंबई,पनवेल आणि मुंबई कमी अंतररावर आहे.
त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्गसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा, अशी सूचना अजित पवार यांनी बैठकीत केली.
येथील जागतिक पर्यटन केंद्रासाठी शासनामार्फत
निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असा विश्वास पवार यांनी दिला. सर्व समावेश आराखडा करावा, अशा सूचना पवार यांनी बैठकीत केली.
आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलीत करावी, लवकरच याबाबत पुणे येथे बैठक घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस आमदार सुनिल शेळके पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे उपस्थित होते.
कुसवली पठार हे समुद्र सपाटीपासून ३ हजार मीटर उंचीवर असून साधारण १ हजार २०० एकरचा हा परिसर आहे. परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी तर दुसऱ्या बाजूस वडिवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहे, अशी माहिती दाभाडे यांनी दिली
कुसवली च्या सरपंच चंद्रभागा दाते म्हणाल्या,” जागतिक पर्यटनाचे केंद्र कुसवली ठरतेय याचा आम्हाला आनंद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी आभार मानते. या प्रकल्पामुळे आमच्या परिसरात रोजगार निर्मिती होईल.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम