तळेगाव स्टेशन:
माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पल्लवी रोहीदास मराठे यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या उपसरपंच रेश्मा किशोर दाभाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
सरपंच पल्लवी दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाच्या निवडी साठी विशेष बैठक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी मराठे यांचा एकमेव अर्ज आल्याने मराठे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
मराठे यांची निवड जाहीर होताच,समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.यावेळी पल्लवी दाभाडे, मनिषा दिलीप दाभाडे, पूनम विनोद आल्हाट, विदुर राजेंद्र पचपिंड,जयश्री बाळू गोठे,रेश्मा किशोर दाभाडे, सुधीर शांताराम आल्हाट , पूजा मयूर दाभाडे, दिपक अरुण दाभाडे या सदस्यांसह जी.एस. खोमणे ग्रामविकास अधिकारी, रवींद्र दाभाडे पोलीस पाटील तसेच माळवाडी गावातील सर्व ज्येष्ठ नेते गोरख दाभाडे, बजरंग जाधव, भिमाजी दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, अशोक दाभाडे, नामदेव दाभाडे, रोहिदास म्हसे, शिवाजी दाभाडे, बबन आल्हाट, बाळासाहेब दाभाडे, शांताराम दाभाडे, सुदाम माळी, बाळासाहेब भोंगाडे, , दत्तात्रय दाभाडे, आदी सर्व ज्येष्ठ उपस्थित होते. आणि गावातील युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
नवनिर्वाचित उपसरपंच पल्लवी मराठे म्हणाल्या,” उपसरपंच पदी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल सहकारमहर्षी माऊली भाऊ दाभाडे,सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ यांचे मी आभारी आहे. माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पार पाडील.