सह्याद्री मावळ चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘मावळातील गुणवंतांचा सन्मान
कामशेत:
सह्याद्री मावळ चॅरिटेबल ट्रस्टने ‘मावळ तालुक्यातील गुणवंतांना विविध पुरस्कार देऊन गौरविले. ट्रस्टच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त हा सन्मान सोहळा संपन्न झाला.कान्हे येथील साई बाबा मंदिराच्या सभागृहात हा छोटेखानी समारंभ पार पडला. या छोटेखानी सोहळ्याने ‘आम्हाला लढायला आणि कष्टाला बळ दिल्याच्या ‘भावना पुरस्कारर्थींनी व्यक्त केल्या.
कल्हाटच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी सुमधूर स्वारात ईशस्तवन आणि स्वागतगीत गायले. माजी उपसभापती शांताराम कदम, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर,टाकवे वडेश्वर गट अध्यक्ष रोहिदास असवले, आंदर मावळ भाजपा अध्यक्ष गणेश कल्हाटकर,अनिल मालपोटे,कृष्णा भांगरे,नंदकुमार शेटे ,बाळासाहेब मालपोटे,योगेश चोपडे,संतोष जाचक,बबनराव आगिवले पाटील,बंडू घोजगे,धोंडीभाऊ घोजगे,संदेश शेलार उपस्थित होते.
अजित जालिंदर करवंदे यांना सह्याद्री मावळ केसरी पुरस्कार,शुभम तानाजी तोडकर सह्याद्री मावळ राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार, बबन धोंडीबा पवळे सह्याद्री मावळ उद्योगरत्न पुरस्कार,रामदास जाखोबा वाडेकर सह्याद्री मावळ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,महादेव वाघमारे सह्याद्री मावळ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,दक्ष काटकर सकाळ पत्रकार सह्याद्री मावळ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,धोंडीबा ज्ञानेश्वर घारे सह्याद्री मावळ आदर्श शिक्षक पुरस्कार,काळूराम मालपोटे सह्याद्री मावळ कृषीरत्न पुरस्कार,ह.भ.प. रोहिदास महाराज धनवे सह्याद्री मावळ वारकरी सांप्रदाय पुरस्काराने गौरविण्यात आले.
काळूराम मालपोटे,रामदास वाडेकर यांनी पुरस्काराला उत्तर दिले. माजी उपसभापती शांताराम कदम यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत अभिनंदन केले. मावळ सह्याद्री ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धोंडीबा थरकुडे असून उपाध्यक्ष योगेश गुलाब शिंदे,सचिव
सुरेश रघुनाथ जगताप,खजिनदार संदीप बबन कल्हाटकर आहेत तर नवनाथ भगवान कल्हाटकर, वैशाली तानाजी शिंदे सदस्या प्रणाली अमोल आगिवले कार्यकारणी सदस्य आहे.
मावळ तालुक्यातून इयत्ता दहावी-बारावी मध्ये प्रथम क्रमांकाने आलेल्या विद्यार्थ्यांचा व मावळ तालुक्यातून महाराष्ट्र पोलीस पदी निवड झालेल्या युवकांचा सह्याद्री मावळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.योगेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नवनाथ कल्हाटकर यांनी सुत्रसंचालन केले. बाळासाहेब थरकुडे यांनी आभार मानले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम