गणपतीदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर, पिंपरी चिंचवड मनपा डॉ.डी.वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम विसर्जनाच्या सातव्या दिवशी राबविण्यात आला.
गणेशोत्सव विसर्जनाच्या सातव्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत हाॕटेल रिव्ह्यु घाट बिर्ला हाॕस्पिटलरोड चिंचवडगाव येथे भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद सकाळी ८ पासुन रात्री १२ वाजेपर्यंत १८५३ मुर्तीचे दान मिळाले आणि जवळजवळ ६ टन निर्माल्यदान मिळाले.
ब प्रभाग अधिकारी अमित पंडित आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपुर्ण दहा दिवस होणार आहे.
संस्थेनी शिफ्ट प्रमाणे सभासदांची निवड करुन सेवा करण्याची संधी दिली आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भरत शिंदे मनोहर कड  शब्बीर मुजावर प्रभाकर मेरुकर सुशिलकुमार गायकवाड  संजित पद्मन  यश ढवळे विश्वास राऊत अरुण कळंबे अभिजित पाटील रमेश भिसे महेंद्र जगताप स्वप्निल सुतार बाजिराव पतंगे उमेश गुर्जर विनोद काळे हितेश पवार पुजा पुराणिक सुनिता गायकवाड स्मिता पद्मन मनिषा आगम विजय आगम कविता वाल्हे मनपाचे चेतन देसले क अ सचिन घनवट मि नि प्रतिक जगताप मजूर रमेश कापुरे शैलेश पोळ सुरक्षा यांनी परिश्रम घेतले.
पुन्हा एकदा मागील वर्षापेक्षा १४३ मुर्तीचे दान अधिक मिळाले मागील वर्षी  सातव्या दिवशी १७१० एकूण १८५३ मुर्तीचे दान मिळाले होते निर्माल्यदान घेण्यासाठी संस्कार संस्कृती सद्भावना महिला बचत चिंचवडेनगर यांनी मदत केली.

error: Content is protected !!