टाकवे बुद्रुक:
आंदर मावळात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या वाढत्या वावराने नागरिकांची चिंता वाढली आहे. रविवारी ता.१७ ला सायंकाळी सहाच्या सुमारास हा बिबट्या फळणे गावात आढळून आला आहे.
यापूर्वीही टाकवे बुद्रुक,फळणे,डाहुली,बेंदेवाडी,लोहटवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन घडले आहे. फळणे गावातील अर्जुन मालपोटे यांची गाय आजारामुळे मृत पावली होती. मालपोटे यांनी त्यांच्या घराच्या समोर एका खाजगी जागेत त्या गाईला टाकले.
त्याच ठिकाणी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान त्या ठिकाणी गुरे चरत असताना त्या ठिकाणी बिबट्या आला. बिबट्या आल्यानंतर अनेक जनावरे खाली पळत आल्यानंतर नागरिकांनचे त्या ठिकाणी लक्ष गेले असता त्या ठिकाणी बिबट्या त्या गाई शेजारी त्या गाईचे मास खाताना दिसून आला आहे. व आता बिबट्या त्या ठिकाणी जाळीमध्ये बसलेला आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम