निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल।
बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल।।
इंदोरी:
येथील चैतन्य इंटरनेशनल स्कूल (सीबीएसई) येथे “हिंदी दिवस” साजरा करण्यात आला. देशात हिंदी भाषेला अधिक चालना मिळावी म्हणून संपूर्ण देशात १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे जिथे सर्व लोक वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या चालीरीतींचे पालन करतात.
दरम्यान देशातील ७७ टक्के लोक हिंदी बोलतात, समजतात आणि लिहितात. हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा देखील आहे. दरवर्षी या दिवसानिमित्त शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याच संदर्भात चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई),इंदोरी येथे आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रातःकालीन प्रार्थना सभेने झाली. या प्रसंगी
विद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख श्री अमोल धिमधिमे सर यांनी हिंदी भाषेचे महत्व ,स्वरूप, आवश्यकता, लोकप्रियता, व प्रचार- प्रसार याबाबत माहिती दिली.
तत्पश्चात इयत्ता ६वीं च्या एका विद्यार्थिनी ने आपल्या भाषणातून हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले. तत्पश्चात इयत्ता २री वर्गा च्या एका मुलीने हिंदी भाषेचे महत्त्व व्यक्त करण्यासाठी कविते चे सुमधुर वाचन केले.
पुढे काही मुलांनी दोहा गायन प्रस्तुत केले. कार्यक्रमाच मुख्य आकर्षण इयत्ता ६वीं ते ८वीं च्या विद्यार्थिनींनी सादर केलेले लघु नाट्य आणि सुन्दर समूह नृत्य होते.
दोनिही प्रस्तुतींना उपस्थितांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. तत्पश्चात विद्यार्थ्यांनी ‘हम होंगे कामयाब’ ह्या गाण्याचे गायन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गान ने झाली.
हिंदी दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा देताना संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर म्हणाले की, ‘भाषा हे संवादाचे व विचार व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येक भाषेचा आपण आदर बाळगला पाहिजे’ असे मोलाचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्या जेसी रॉय आणि अध्यक्ष भगवान शेवकर यांनी हिंदी विभाग प्रमुख अमोल धिमधिमे, समस्त शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाला हिंदी दिनाच्या शुभेच्छा प्रेषित केल्या.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम