टाकवे बुद्रुक:
श्रीसंत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष व टाकवे बुद्रुकचे माजी पोलीस पाटील विठ्ठलराव दगडू असवले (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन बहिणी,चार मुली,सुन,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा असवले त्यांच्या स्नुषा तर उद्योजक बाबाजी असवले त्यांचे पुत्र होत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्वदच्या दशकात माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. राजकारण,समाजकारण,शिक्षण,संप्रदाय अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. भाऊ या नावाने ते लोकप्रिय होते.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम