कामशेत :
येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर येथे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत लोणावळा विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून नशा मुक्ती अभियान’ या दोन्ही उपक्रमा अंतर्गत कामशेत पोलीस स्टेशनचे वतीने *निबंध स्पर्धा** आयोजित करण्यात आले.
बारावीच्या आर्ट्स,कॉमर्स, सायन्स शाखेतील मुलांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला.या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. गौरव चिन्ह, प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
युवकांना नशेचे दुष्परिणाम बाबत जनजागृती करून आपला देश नशा मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन कार्तिक यांनी
केले.राष्ट्रभावना राष्ट्रप्रेम वाढीस लागावे व त्यांनी नशा मुक्त निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करून देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी योगदान द्यावे त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून कार्यक्रम आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कॉलेजमधील विद्यार्थी ,माध्यमिक विद्यालयातील शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी, प्राचार्य व कॉलेजमधील शिक्षक, पोलीस स्टाफ उपस्थित होते.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम