जागतिक छायाचित्रदिन तळेगाव दाभाडेत उत्साहात साजरा
छायाचित्रण ही आठवणींना संस्मरणीय करणारी कला: जाधव गुरुजी
तळेगाव दाभाडे :
आयुष्यातील अनेक प्रसंगांना जतन करत त्या आठवणींना कायम संस्मरणीय ठेवणारी छायाचित्रण ही कला आहे. नुसते क्लिक करून ती येत नाही, तर त्यामागे छायाचित्रकाराच्या कलाविष्कारासाठी घेतलेली मेहनत, अभ्यास, अनुभव आणि दृष्टी असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार तथा कलाशिक्षक रमेश जाधव गुरुजी यांनी येथे केले.

तळेगाव दाभाडे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिन तळेगाव दाभाडेत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

वतननगर येथील पारिजात हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी एमआयडीसीचे माजी अध्यक्ष विन्सेंट सालेर उपस्थित होते. यावेळी यतीश सोनपाल, हणमंत शिंदे, शेखर होनप, दिनेश सोलंकी, शशिकांत शिंदे या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान संघटनेचे अध्यक्ष अंकुश दाभाडे व उपाध्यक्ष श्रीकांत चेपे, सचिव प्रीतम काथवटे यांच्या हस्ते   करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत देसाई यांनी केले.

जाधव गुरुजी पुढे म्हणाले, की
आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या क्षणांच सोनं करण्याचं सामर्थ्य फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांच्या चित्रीकरण कलेत असते. केवळ क्लिक केले की झालं, इतकी ही कला सोपी नाही.त्यामागे खूप चिकाटी, मेहनत, त्याग, ध्यास, साधना व दृष्टी जोपासावी लागते. एक हजार शब्द जे सांगू  शकणार नाहीत ते एक समर्पक छायाचित्र सांगून  शकते. फोटोग्राफीचं पॅशन जीवापाड जपणा-या आणि त्यासाठी वेड्यापीसा होणा-या छायाचित्रकार सर्व मित्रांचा मला प्रचंड अभिमान वाटतो. देवा मखामले यांनी सिनेमॅटोग्राफी विषयावर व्याख्यान दिले.

प्रास्ताविक दत्ता निकम यांनी केले. आभार योगेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास स्थानिक छायाचित्रकार व्हिडिओ ग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!