टाकवे बुद्रुक:
मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचा टाकवे नाणे गटातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सावळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच नामदेव गोंटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासह पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शरद बूट्टे पाटील आणि तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी स्वागत केले.
नामदेव गोंटे यांच्याबरोबर अनसूटे गावातील नथू मोधळे, बंडू लष्करी, राजाराम मोधळे, काळूराम शिवेकर, प्रकाश घाग, नाना मोधळे, चहादू घाग, संजू जगताप, रमेश टाकळकर, कुंडलिक मोधळे, निवृत्ती मोधळे, मुक्ताताई मोधळे इत्यादी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलतोय. देशातील जनतेच्या हिताचा विचार करत मोदी सरकार कल्याणकारी निर्णय घेत आहे. मोदीजींच्या या दूरदर्शी विचारांनी आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन युवा वर्गापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण भाजपात प्रवेश करत आहेत.
कारण देशातील सर्व नागरिकांना हा विश्वास आहे की देशाच्या विकासाला मोदीजींच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, याचं प्रेरणेतून आंदर मावळ भागातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला” अशी माहिती रविंद्र भेगडे यांनी दिली.
महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात कष्टकरी आणि शेतकर्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. सामान्य नागरिकांनाही सरकारच्या या विविध योजनांचा लाभ घेता यावा, योजनांची माहिती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय वडगाव मावळ मोफत अर्ज भरण्याची सुविधा कार्यान्वित केली असून याचा देखील नागरिकांनी लाभ घ्या, अशी माहिती मावळ भाजपा तालुका अध्यक्ष तथा भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली.
या कार्यकर्ता मेळाव्याला मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर,जेष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी, माजी पं.स. सभापती गणेश गायकवाड, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,निवृत्त पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर साबळे, रामदास गाडे, यदुनाथ चोरघे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, कल्याणी ठाकर,मंगल टेमगिरे,आशा जाधव, अभिमन्यू शिंदे, अमोल भेगडे, मावळ ता. कृ.उ. बा.स.संचालक नामदेव कोंडे,टाकवे नाणे गट अध्यक्ष रोहिदास असवले,नामदेव कुंभार, किरण राक्षे,गणेश कल्हाटकर, रवि शेटे, विजू टाकवे, पुंडलिक खांडभोर,अरुण कूटे, अमोल भोईरकर,अनंता असवले, विशाल भांगरे,सचिन पांगारे, इंदाराम उंडे,लक्ष्मण तळावडे, सुरेश आलम, रामदास आलम, सतीश सावंत इत्यादींसह गटातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम