आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्राचे मोफत वाटप
उंबरवाडीतील कातकरी बांधवांना मिळाले घरपोच जातीचे दाखले
कामशेत :
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून नाणे मावळातील खांडशी ग्रामपंचायत अंतर्गत उंबरवाडी येथील २६ कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर रहात असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात जाऊन जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही.ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील तीन वर्षांपासून ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांच्या कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेतले.

त्यानंतर टप्प्याटप्याने प्रत्येक गावात जाऊन मोफत जातीचे दाखले वाटप करण्यात आले.याचा फायदा दोन हजारांहून अधिक कातकरी कुटुंबाना आजपर्यंत झाला आहे.कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना मोफत घरपोच उपलब्ध झाल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.
 
यावेळी स्वीय सहाय्यक सचिन वामन, ज्ञानेश्वर मोहिते, सदस्य शिमग्या वाघमारे, किसन कोळी, शिवाजी जाधव,भगवान जाधव,विजय वाघमारे,संतोष पवार,पांडुरंग कोळी आदि.उपस्थित होते.

error: Content is protected !!