इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे पवना मेडिकल फाऊंडेशनने राबविले जीवन रक्षक अभियान
सोमाटणे:
पवना मेडिकल फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब तळेगांव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने इनरव्हील क्लब मेंबर्ससाठी जीवन रक्षक अभियान राबविले गेले. जीवनदान हे सर्वश्रेष्ठ आहे. इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या क्लब हाऊस मध्ये पवना मेडिकल फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ वर्षा वाढोकर यांनी हा उपक्रम राबविला.
वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्याचे प्राण वाचविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने नेमके कसे आणि कोणते प्रथमोपचार करायचे याचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक डॉ. अनुपमा, डॉ. नीलम आणि डॉ प्रचिती यांच्याकडून करण्यात आले.
श्वानदंश, सर्प दंश झाल्यावर रुग्णाला तातडीने हॉस्पिटल मध्ये नेण्यापूर्वी दिलासा देऊन त्याची हालचाल कमी होईल याकडे लक्ष द्यावे जेणेकरून त्याचे रक्ताभिसरण सामान्य राहील. घशात काही अडकल्याने श्वास गुदमरला जात असताना जर ती सर्वसामान्य व्यक्ती किंवा गर्भवती महिला वा बालकांना कसे जपावे, शास्त्रीय पद्धतीने त्यांचे प्राण कसे वाचवावे याचे वेगवेगळे प्रात्यक्षिक करून दाखवले.
सध्या हृदयरोगाचे प्रमाण फार वाढले आहे. एखाद्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक, कार्डिअॅक अरेस्टचा त्रास जाणवला तर CPR ट्रीटमेंट कशी द्यावी जेणेकरून, रुग्णाच्या हृदय आणि फुफुस यांचे पुनरुत्थान करता येईल आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचे प्राण वाचतील याचे मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिला सभासदांकडून याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे की CPR दिल्याने रुग्णाचा प्राण वाचू शकतात. खूप कमी जणांना CPR देता येतो. याबद्दल अनेक रहिवासी सोसायट्यांमध्येही पवणा मेडिकल फाऊंडेशनने जनजागृती करायचे ठरवले आहे, असे प्रतिपादन डॉ वर्षा वाढोकर यांनी केले. ५० सभासदांनी या जीवन रक्षक प्रणाली ट्रेनिंगचा लाभ घेतला. प्रेसिडेंट संध्या थोरात, सेक्रेटरी निशा पवार, ट्रेझरर भाग्यश्री काळेबाग, आयएसओ वैभवी पवार यावेळी उपस्थित होत्या.
प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी डॉ वर्षा वाढोकर त्यांच्या सहकारी आणि पवना मेडिकल फाऊंडेशन यांनी प्रात्यक्षिकासह दिलेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम