पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्षपदी सचिन घोटकुले यांची फेरनिवड
वडगाव मावळ:
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी सचिन घोटकुले यांची फेरनिवड करण्यात आली.उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,मावळचे आमदार सुनिल शेळके,यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, तालुकाध्य्क्ष गणेश खांडगे उपस्थित होते. सचिन घोटकुले यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात,युवा अस्मिता रॅली, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर,दहा हजार वृध्दांना चष्मे वाटप,आरोग्य तपासणी शिबीर,आदी अनेक उपक्रम राबवून जिल्हयातील युवक संघटना वाढविण्याचे काम केले या कामाची दखल घेत घोटकुले यांच्यावर विश्वास दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.

निवडीनंतर घोटकुले यांचा बबनराव भेगडे,पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मु-हे,मावळ युवकचे माजी अध्यक्ष संतोष दाभाडे,मावळ तालुका ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला असल्याची माहिती  पीएमआरडीए सदस्य  माजी नगरसेवक  संतोष छबुराव भेगडे यांनी दिली.

error: Content is protected !!